बांधकामासाठी बुलडाणेकरांची भिस्त परजिल्ह्यातील रेतीवर; अवैध रेती वाहतुकीस आला उत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 06:34 PM2017-12-26T18:34:48+5:302017-12-26T18:40:38+5:30

बुलडाणा : एकही रेतीघाट नसलेल्या बुलडाणा तालुक्यात लगतच्या जालना जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर रेतीची चोरटी वाहतूक होत असून त्याची कुणकूण लागताच महसूल विभागाने तहसिलदार सुरेश बगळे यांच्या नेतृत्त्वात सीमावर्ती भागात दोन गस्तीपथके गेल्या आठ दिवसापासून तैनात केली. 

an illegal sand trafcking in buldana distric | बांधकामासाठी बुलडाणेकरांची भिस्त परजिल्ह्यातील रेतीवर; अवैध रेती वाहतुकीस आला उत

बांधकामासाठी बुलडाणेकरांची भिस्त परजिल्ह्यातील रेतीवर; अवैध रेती वाहतुकीस आला उत

Next
ठळक मुद्देतहसिलदार सुरेश बगळे यांच्या नेतृत्त्वात सीमावर्ती भागात दोन गस्तीपथके गेल्या आठ दिवसापासून तैनात केली. आतापर्यंत जवळपास १७ लाख रुपयांचे अवैध गौणखनीज जप्त केले आहे.बुलडाणा तालुक्यात एकही रेतीघाट नसल्याने नसल्याने बुलडाणा शहरासह लगतच्या पट्ट्यात खडपूर्णाच्या रेतीवरच अनेकांची भिस्त असते.

बुलडाणा : एकही रेतीघाट नसलेल्या बुलडाणा तालुक्यात लगतच्या जालना जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर रेतीची चोरटी वाहतूक होत असून त्याची कुणकूण लागताच महसूल विभागाने तहसिलदार सुरेश बगळे यांच्या नेतृत्त्वात सीमावर्ती भागात दोन गस्तीपथके गेल्या आठ दिवसापासून तैनात केली. आतापर्यंत जवळपास १७ लाख रुपयांचे अवैध गौणखनीज जप्त केले आहे. मंगळवारीही पथकाने एक धडक कारवाई करीत एक टिप्पर ताब्यात घेतले होते. बुलडाणा-जाबं, तांदुळवाडी सह तालुक्याच्या सीमावर्ती भागात सात मंडळ अधिकारी आणि तलाठी शासकीय वाहनाचा वापर न करता पाळत ठेवत असून ही कारवाई करत आहे. बुलडाणा जिल्हा भौगोलिक दृष्ट्या मराठवाड्याच्या लगत आहे. मराठवाड्यातील गौताळा अभयारण्यातून उगम पावणार्या खडकपूर्णा नदीमधील रेती ही बांधकामासाठी उत्तम मानल्या जाते. त्यामुळ बुलडाणा,चिखली तालुक्या लगतच्या भागातून बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रेतीची चोरटी वाहतूक होते. मध्यरात्री दीड ते पहाटे साडेचार पाच वाजेपर्यंत  टिप्पर ही चोरटी वाहतूक करीत असतात. मुळात बुलडाणा तालुक्यात एकही रेतीघाट नसल्याने नसल्याने बुलडाणा शहरासह लगतच्या पट्ट्यात खडपूर्णाच्या रेतीवरच अनेकांची भिस्त असते. त्यामुळे या रेतीला मागणी आहे. प्रामुख्याने सीमावर्ती भागातून ही रेती बुलडाणा जिल्ह्यात दाखल होते. जाफ्राबाद तालुक्यात ही रेती बुलडाणा तालुक्यात दाखल होते. यातील काहींकडे रायल्टीसंदर्भातील कागदपत्रे असली तरी काहींजवळ ती नसल्याने महसूल विभागाने ही या प्रकरणी धडक कारवाईचा बडगा उचलला आहे.

चोरट्या वाहतुकीची ४४ प्रकरणे उघड

लगतच्या जालना जिल्ह्यातून बुलडाणा जिल्ह्यात रेतीची अवैध वाहतूक केल्या प्रकरणी बुलडाणा तहसिलने ४४ प्रकरणामध्ये कारवाई करून जवळपास १७ लाख रुपयांचा दंड गेल्या तीन महिन्यात वसूल केला आहे. सोबतच सहा प्रकरणामध्ये मरूमाची विनापरवानगी उत्खनन आणि वाहतूक केल्या प्रकरणीही दंड ठोठावला गेला आहे. तीन महिन्यात जवळपास ५१ प्रकरणे तहसिलदार सुरेश बगळे यांनी धडक कारवाई करून उघड केली आहे.

महसूल यंत्रणा रात्र गस्तीवर

 बुलडाणा तहसिलतंर्गत असलेली महसूल यंत्रणा सध्या रेतीची अवैध वाहतूक व उत्खनन करणार्याविरोधात धडक कारवाई करत आहे. त्यानुषंगाने तहसिलदार सुरेश बगळे आणि नायब तहसिलदार माळी यांची दोन पथके कार्यरत असून तांदुळवाडी, जांब, सातगाव म्हसला तथा सैलानी लगच्या पट्ट्यात खासगी वाहनाद्वारे महसूलचे हे कर्मचारी पाळत ठेवत आहे. त्यातंर्गतच २६ डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या एका कारवाईत एक टिप्परही जप्त करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Web Title: an illegal sand trafcking in buldana distric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.