दारुची अवैध वाहतूक; दोन जणांना अटक
By admin | Published: January 28, 2017 02:30 AM2017-01-28T02:30:12+5:302017-01-28T02:30:12+5:30
मेहकर पोलिसांची धडक मोहिम.
मेहकर, दि. २७- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेहकर पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली असून, २५ जानेवारी रोजी दारुची अवैध वाहतूक करणार्या दोन जणांना अटक करून ३५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
सुलतानपूर परिसरात अवैध दारुची विक्री व वाहतूक मोठय़ा प्रमाणात सुरू असल्याने २५ जानेवारी रोजी पोउनि तान्हाजी गव्हाणे, एएसआय राहाणे, पो.ना.शांताराम जाधव, पोकाँनवृत्ती सानप यांनी सापळा रचून सुलतानपूर ते लोणार रोडवर सुझूकी मोटारसायकल क्रमांक एम.एच.२८ जी.७५0३ वर ज्ञानेश्वर शिवकांत मेहराळ व सुनील शेषराव खंदारे हे दोघे जण विदेशी दारुची अवैध वाहतूक करताना आढळून आले.
त्या दोघांजवळून बियरच्या बाटल्या व इतर विदेशी दारुच्या अशा एकूण ७२ बाटल्या जप्त करून मोटारसायकलसह ३५ हजार रुपयांचा माल जप्त करून आरोपीला अटक केली आहे.