जिल्ह्यात अवैध रेतीची वाहतूक जोमात

By admin | Published: May 16, 2017 12:52 AM2017-05-16T00:52:44+5:302017-05-16T00:52:44+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात अवैध रेतीची वाहतूक जोमात सुरू असून, सोमवारी लोणार, सिंदखेडराजा, मलकापूर या तीन ठिकाणी अवैध रेती विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.

Illegal traffic congestion in the district | जिल्ह्यात अवैध रेतीची वाहतूक जोमात

जिल्ह्यात अवैध रेतीची वाहतूक जोमात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात अवैध रेतीची वाहतूक जोमात सुरू असून, सोमवारी लोणार, सिंदखेडराजा, मलकापूर या तीन ठिकाणी अवैध रेती विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.
सिंदखेडराजा : तालुक्यातील खडकपूर्णा नदीतील रेती अवैधरीत्या वाहतूक करणारे दोन ट्रक तहसीलदार संतोष कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने पकडले. ट्रकधारकांकडून एक लाख दहा हजार रुपयांचा दंड वसूल करून सदर ट्रक सोडून देण्यात आल्याची माहिती तहसीलदार संतोष कणसे यांनी दिली.
अवैध रेती वाहतूक करीत असलेल्या वाहनाचा पाठलाग करून राहेरी येथील तलाठी आर.एस.देशमुख यांनी ट्रक क्रमांक एम.एच. १० इ.जी. १९२३ वाहन मालक निवृत्ती आसाराम काळे राहणार गंगापूर, ता.गंगापूर, जि. औरंगाबाद यांचे सदर ट्रक पकडले. सदर ट्रकमध्ये आठ ब्रास रेती अवैधरीत्या वाहतूक करीत असल्यामुळे ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, तसेच वाहन क्रमांक एम.एच.२० बी.टी. २८४६ मालक शे अजहर शे.उमर ता.जि.जालना हे वाहन टी.पॉइंट सिंदखेडराजा येथे महसूल विभागाच्या पथकातील मंडळ अधिकारी बी.बी. वाघ यांनी पकडून तीस हजार दंड वसूल करण्यात आला. १३ व १४ मे रोजी शासकीय सुटी असल्यामुळे दोन्ही वाहनधारकांकडून जातमुचलका १०० रुपये बाँडवर नियमानुसार कार्यवाही करून १४ मे रोजी सकाळी ११ वाजता वाहन सोडून देण्यात आले.
तहसीलदार संतोष कणसे यांचे महसूल पथकाने एप्रिल २०१७ पासून आजपर्यंत २४ प्रकरणात ४ लाख २० हजार १०० रुपये दंड वसूल केल्यामुळे रेतीमाफियांमध्ये घबराहट पसरली आहे.
संग्रामपूर : रेती वाहतुकीचा परवाना नसलेले टिप्पर तहसील कार्यालयात लावण्यात आले. ही कारवाई १५ मे रोजी संध्याकाळी ६ वाजेदरम्यान उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे यांनी केली.
चांगेफळ फाट्याकडून भेंडवळ गावाकडे विना परवाना रेतीची वाहतूक करताना टिप्पर क्र.एमएच २८-एबी-३१७७ चा चालक साहेबराव पांडुरंग नेमाडे हा आढळून आला. दरम्यान, उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे हे चांगेफळ फाट्याकडून संग्रामपूरकडे दौऱ्यावर येत होते. ही बाब त्यांच्या लक्षात आली असता, त्यांनी टिप्पर थांबवून रेती वाहतुकीचा परवाना असल्याचे टिप्परचालकास विचारले; मात्र टिप्परचालकाकडे रेती वाहतुकीचा परवाना नसल्याने हे टिप्पर संग्रामपूर तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे.

लोणार येथे दोन टिप्परची धडक
लोणार : लोणार - सुलतानपूर मार्गावर सोमवारला दुपारी ४ वाजताच्या सुमारास दोन टिप्परची धडक झाली. सोमवारी दुपारी टाटा ४०७ क्रमांक एम.एच.२३ डब्ल्यू. ०६० व टाटा ४०७ एम.एच.१६. ए.ई. ३६५४ ही वाहने एकमेकांवर आदळल्यामुळे तासभर वाहतूक खोळबंळली. याकडे मात्र लोणार महसूल विभागाचे अधिकारी अर्थपूर्ण कानाडोळा करीत आहेत. लोणार पोलीस स्टेशनचे वाहतूक शाखेचे राठोड यांनी वाहने हटवत तासभर खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Illegal traffic congestion in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.