विदेशी दारूची अवैध वाहतूक
By admin | Published: May 31, 2017 12:58 AM2017-05-31T00:58:02+5:302017-05-31T00:58:02+5:30
नांदुरा : विदेशी दारूची अवैध वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी पकडल्याची घटना २९ मे रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास डागा पेट्रोल पंपाजवळ घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : विदेशी दारूची अवैध वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी पकडल्याची घटना २९ मे रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास डागा पेट्रोल पंपाजवळ घडली.
खामगावकडून आसलगावकडे एमएच २८ एन ०१३१ क्रमांकाच्या कारमधून अवैधरीत्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर वाहनांची तपासणी केली. यामध्ये विदेशी कंपनीच्या दारूचे तीन खोके ज्यामध्ये १८० मि.ली.च्या १३० बॉटल (कि.१८ हजार २०० रूपये) व कारची किं. ५ लाख ५० हजार असा एकूण ५ लाख ६८ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणाचे एएसआय प्रकाश राठोड यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रकाश गुलाबराव गावंडे (वय ४१) रा. आसलगाव व योगेश ओंकार बोराखडे (वय २८) रा. आसलगाव यांच्याविरुद्ध कलम ६५ (अ) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे वाशिम जिल्ह्यातील अवैध दारू पोलिसांनी पकडली होती.