अवैध वाहतूक मजुरांच्या जीवावर बेतली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:37 AM2021-08-22T04:37:24+5:302021-08-22T04:37:24+5:30

अपघात झाला. त्यात तेरा जणांचा बळी गेला. या घटनेला जबाबदार धरले गेलेल्या टिप्पर चालक आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर विविध ...

Illegal trafficking pays off for workers? | अवैध वाहतूक मजुरांच्या जीवावर बेतली?

अवैध वाहतूक मजुरांच्या जीवावर बेतली?

Next

अपघात झाला. त्यात तेरा जणांचा बळी गेला. या घटनेला जबाबदार धरले गेलेल्या टिप्पर चालक आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकास अटक करण्यात आली आहे. असे असले तरीही अपघाताची खरी जबाबदारी कोणावर हा प्रश्न आहे. मजुरांची अशाप्रकारे अवैध वाहतूक का करण्यात आली? मजुरांना ने-आण करण्यासाठी असलेल्या नियमांचा आणि त्यातील व्यवस्थांचा उपयोग का करण्यात आला नाही असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.

याच संदर्भात शासनाच्या बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांकडून काही मुद्दे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रश्नांतून संपूर्ण घटनेला नेमके कोण जबाबदार आहे याचा उलगडा होण्याची अवश्यकता आहे.

--अपघातासंदर्भात पडलेले काही प्रश्न--

-अपघात झालेला रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या रस्त्याच्या बाजूचे शोल्डर व्यवस्थित असावेत असा नियम आहे, मग तढेगावं रस्त्यावर असे शोल्डर होते का?

-मजुरांची वाहतूक करण्यासाठी बैठक व्यवस्था असलेले वाहन असावे लागते असा नियम असताना मजुरांची वाहतूक मालवाहक वाहनातून का केली गेली?

- मजुरांना कामावर घेण्यापूर्वी त्यांचा विमा उतरविला होता का?

-मजुरांना सेप्टी जॅकेट, सेफ्टी शूज, कॅप असावी लागते, ते या मजुरांना का दिले गेले नाहीत?

-मजुरांना राहण्याची आणि खान पानाची व्यवस्था स्वतंत्र असावी. तढेगाव कॅम्पवर ही व्यवस्था होती का?

- कामगार अधिकाऱ्यांनी या व्यवस्था असल्याची खात्री करून घेतली होती का?

असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत. या संपूर्ण व्यवस्था नियमाने असाव्या लागतात तर मग इथे या व्यवस्थांची वानवा का होती. व्यवस्था असत्या तर मजुरांचा अशा विचित्र अपघातात हकनाक बळी गेला नसता. त्यामुळे वाहन चालक आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर यांच्यावरच जबाबदारी निश्चित करून या घटनेतून कोणाला वाचविण्याचा प्रयत्न होत आहे का? अशी चर्चा या परिसरात आहे. परिणामी घटनेची सखोल चौकशी करून दोषी असलेल्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. याची शासन, प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Illegal trafficking pays off for workers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.