अवैध वाहतूक बेतली मजुरांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 11:38 AM2021-08-22T11:38:43+5:302021-08-22T11:38:55+5:30

Buldhana Accident News : टिप्पर चालक आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकास अटक करण्यात आली आहे.

Illegal transport on the lives of laborers | अवैध वाहतूक बेतली मजुरांच्या जीवावर

अवैध वाहतूक बेतली मजुरांच्या जीवावर

Next


मुकुंद पाठक
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेड राजा : शुक्रवारच्या भीषण अपघातामुळे होत्याचे नव्हते झाले. मुळात मजुरांवर ही वेळ का आली असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सार्वजनिक बांधकाम क्षेत्रातील काही नियम पायदळी तुडविले जात असल्याची अेारड होत आहे.
अपघात झाला. त्यात तेरा जणांचा बळी गेला. या घटनेला जबाबदार धरले गेलेल्या टिप्पर चालक आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकास अटक करण्यात आली आहे. असे असले तरीही अपघाताची खरी जबाबदारी कोणावर हा प्रश्न आहे. मजुरांची अशाप्रकारे अवैध वाहतूक का करण्यात आली? मजुरांना ने-आण करण्यासाठी असलेल्या नियमांचा आणि त्यातील व्यवस्थांचा उपयोग का करण्यात आला नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास या दुर्घटनेनेस नेमके कोण जबाबदार आहे याचा उलघडा या निमित्ताने होऊ शकतो. त्यादृष्टीने तपासाची गरज आहे.


मृतकांच्या मुळ गावी हाेणार अंत्यसंस्कार 
अपघातील तेराही मृतकांवर त्यांच्या मध्यप्रदेशातील मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जालना सामान्य रूग्णालयात २१ ऑगस्ट राेजी दुपारी मृतकांच्या पार्थीवाचे शवविच्छेदन झाले. त्यानंतर १३ रूग्णवाहीकांव्दारे मृतदेह मध्य प्रदेशातील खरगाेन आणि धार जिल्ह्यातील मुळगावी पाठविण्यात आल्याचे तहसिलदार सुनिल सावंत यांनी सांगितले. दरम्यान मध्यप्रदेश पाेलिस आणि तेथील महसूल विभागाचे कर्मचारीही जालना येथे दाखल झाले हाेते. 

अपघाताच्या प्रत्यक्षदर्शीशी आयजींची चर्चा
  हा अपघात झाला तेव्हा तेथे जवळच त्र्यंबक फलटणकर नामक शेतकरी गुरांसाठी गवत कापत होते. फलटणकर यांना अचानक मोठा आवाज झाल्याचे ऐकू आले. त्यामुळे आवाजाच्या दिशेने ते गेले असता तेथे त्यांना फक्त एक लहान मुलगीच पप्पा पप्पा असा आवाज करत प्रथमत: दिसली होती, असे त्यांनी या अपघात स्थळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांना सांगितले. 
  अपघात स्थळाला अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी शनिवारी भेट देऊन पाहणी केली. त्यामुळे शासनस्तरावरून ही या अपघाताची गंभीर दखल घेण्यात आली असल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: Illegal transport on the lives of laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.