रेतीच्या अवैध वाहतुकीने तीन वर्षात घेतले ११ बळी, ग्रामस्थांचा मराठवाड्याच्या सीमेवर रस्ता रोको
By निलेश जोशी | Published: March 14, 2024 02:59 PM2024-03-14T14:59:05+5:302024-03-14T14:59:21+5:30
अजिसपूर येथील एकाचा गुरूवारी अपघाता झाला मृत्यू: वाहनाचा शोध सुरू
लोणार: विदर्भ-मराठवाड्या्च्या सिमेवर लोणार तालुक्यातील अजिसपूर फाट्यावर गुरूवारी सकाळी ग्रामपंचायत ऑपरेटचा रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी अजिसपूर फाट्यावर रास्ता रोको केला.
गुरूवारी सकाळी शेक सिराज शेख अयूब हे एमएच-१७-बीसी-९२१० क्रमांकाच्या दुचाकीने अजिसपूर येथून लोणारकडे जात होते. त्यावेळी रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात शेख अयूब गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी शेख सिराज यांना मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचारसाठी दाखल केेल. तेथे प्रथमोपचार करून त्यांना जालना येथे हलविण्यात आले असता रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. प्रकरणी ज्या वाहनाने हा अपघात केला. त्या वाहनावर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी तळणी-लोणार मार्गावर अजिसपूर फाट्यावर टायर जाळून रास्ता रोको केला.
नातेवाईक रस्त्यावर
मराठवाड्यातील पुर्णा नदीपात्रातून रात्रंदिवस वाळूचा उपसा करून लोणामार्गे विदर्भात सर्वदूर रेतीची अवैध वाहतूक होते. क्रमांक नसले्लया वाहनातून ती होत असून आरटीअेांचेही याकडे दुर्लक्ष आहे. लोणार तहसिल प्रशासन व पोलिस प्रशासनावर मृतकाच्या नातेवाईकांनी या प्रश्नी अर्थपूर्ण संबंध असल्याचा आरोप करत रास्ता रोको केला आहे. मंठा तहसिलकडून रेतीच्या अवैध वाहतूकप्रकरणीकार कारवाई होते. परंतू लोणार तहसिल व लोणार पोलिसांकडून ती का? होत नाही, असा प्रश्न संतप्त नातेवाईक शेख अतिक शेख चाँद, शेख रसीद शेख दस्तगीर, शेख यासीन शेख कासम, शेख मुहमद रफीक यांच्यासह अनेकांनी केली.
चार महिन्यात पाच बळी
गत तीन वर्षात रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे विदर्भाच्या हद्दीत सात तर मराठवाड्याच्या हद्दीत चार जणांचा बळी घेतला आहे. २०२४ मध्ये आतापर्यंत विदर्भात एक तर मराठवाड्याच चार जणांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. १५ दिवसापूर्वीच तळणी येथील एका शेतकऱ्याचा अपघातामध्ये अशा पद्धतीने मृत्यू झाला होता