लाकडाची अवैध वाहतूक ट्रकसह साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
By अनिल गवई | Published: November 7, 2023 02:10 PM2023-11-07T14:10:16+5:302023-11-07T14:13:24+5:30
वनविभागाची कारवाई, अवैध लाकूड व्यावसायिकांमध्ये खळबळ
खामगाव: अवैधरीत्या विनापरवाना लाकुडाची वाहतूक करणारा ट्रक वनपरिक्षेत्र फिरते पथकाने जनुना चौफुलीवर नाकाबंदी दरम्यान पकडून ट्रक ताब्यात घेऊन चालका विरुध्द विविध कल्मानुसार वन गुन्हा नोंदविला आहे. ही कारवाई सोमवारी उशीरा करण्यात आली.याबाबत सविस्तर असे की, खामगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एस आर पाटील यांचे फिरते पथक यांच्या मार्गदर्शनाखाली फिरते पथकातील कर्मचारी पो.हे.का सुनील जाधव, वनपाल आर बी वाघ वनरक्षक जुमळे, यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी खामगाव बायपास वरील जनुना चौफुलीवर नाकाबंदी करून ट्रक क्रमांक आर जे १४ जीजे ७८५९ या ट्रकला थांबवले.
पंचायत समक्ष ट्रकची पाहणी केली असता त्या ट्रकमध्ये अाडजात जळतं व विविध प्रकारचे लाकूड दिसून आले. याबाबत त्याला परवाना विचारला असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याकडे कुठलाही परवाना आढळून न आल्याने सदर ट्रक चालकास ट्रक ताब्यात घेऊन ट्रक सह लाकूड ५लाख ६२ हजार १४९ रू चा मुद्देमाल जप्त केला. तसेच ट्रकचालक सलमान खान फिरोज खान ३१ वर्ष रा. बऱ्हाणपूर एमपी याच्याविरुद्ध
वन कायद्यानुसार विविध कलमानुसार गुन्हा नोंदवीला आहे.