'एनएमसी' विधेयकाविरोधात लढा देण्याचा 'आयएमए'चा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 01:28 PM2019-08-02T13:28:58+5:302019-08-02T13:29:35+5:30
एनएमसी विधेयकाच्या निषेधार्थ आएयमएच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला.
चिखली : 'एनएमसी' बिलाच्या माध्यमातून सरकारने समाजाच्या आरोग्याचा खेळ मांडला आहे. वैद्यकीय क्षेत्रासाठी हे विधेयक घातक असून समाजाचे आरोग्य जपण्याच्या बांधिलकीतून आयएमएने त्याविरोधात आंदोलन पुकारले असल्याची माहिती आयएमए चिखली शाखेच्या अध्यक्ष डॉ. संध्या कोठारी व सचिव डॉ. संदीप वाघ यांनी दिली. एनएमसी विधेयकाच्या निषेधार्थ आएयमएच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानुषंगाने पत्रकार परिषद घेऊन आयएमएने भूमिका विषद केली. नव्या विधेयकानुसार एकप्रकारे बोगस डॉक्टरांना कायदेशीर मान्यता देण्याचा प्रकार आहे. यामुळे आरोग्यसेवेचा स्तर खालावणार असल्याचा आरोप यावेळी सर्व डॉक्टरांनी केला. वैद्यकीय शिक्षण ही फक्त धनदांडग्यांची मक्तेदारी होईल. हे विधेयक समाजाच्या आरोग्यासाठी धोकादायक असून समाजाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आम्ही बांधील आहोत. त्यामुळे या विधेयकाविरोधात आंदोलन पुकारले असून यापुढे हा लढा सुरु राहणार असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. यावेळी डॉ. संध्या कोठारी, डॉ. संदीप वाघ, डॉ. वासू, डॉ. सुहास तायडे, डॉ. रामेश्वर दळवी, डॉ. पोहरकर, डॉ. विष्णू खेडेकर, डॉ. सुहास खेडेकर, डॉ.शिवशंकर खेडेकर, डॉ. जोशी, डॉ. सावळे, डॉ. जवंजाळ, डॉ. महिंद्रे, डॉ. वानखेडे, डॉ. सचिन खरात, डॉ. अमोल राजपूत, डॉ. संतोष सावजी, डॉ. प्रियेश जैस्वाल, डॉ. मनीष काळे, डॉ. भारत पानगोळे, डॉ. विठ्ठल काळूसे, डॉ. राहुल राजपूत, डॉ. धनवे, डॉ. तनपुरे, डॉ. मिसाळ, डॉ. गोसावी, डॉ. उदय राजपूत, डॉ. खंडागळे, डॉ. चेतन समदाणी आदी हजर होते. आयएमए चिखली शाखेची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून डॉ. सुहास तायडे हे अध्यक्ष तर डॉ. शिवशंकर खेडेकर यांची सचिवपदी सर्वानुमते निवड करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. (तालुका प्रतिनिधी )