ग्राहकांच्या पसंतीनुरूप तत्काळ साकरल्या जातात ‘श्री’च्या मूर्ती!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:55 AM2017-08-26T00:55:45+5:302017-08-26T00:59:12+5:30

बुलडाणा: तुम्हाला हव्या असलेल्या रूपात श्री गणेशाची मातीची  मूर्ती बनवून तत्काळ विक्री करण्याचा उपक्रम शिरपूर येथील  जिल्हा परिषदेवरील शिक्षकाने शुक्रवारी राबविला. ऑर्डर  दिल्यानुसार तत्काळ गणेशाची मातीची मूर्ती बनवून ग्राहकांना  देण्यात येत होती. 

The image of 'Shri' is done immediately after the customer's choice! | ग्राहकांच्या पसंतीनुरूप तत्काळ साकरल्या जातात ‘श्री’च्या मूर्ती!  

ग्राहकांच्या पसंतीनुरूप तत्काळ साकरल्या जातात ‘श्री’च्या मूर्ती!  

Next
ठळक मुद्देग्राहकांच्या पसंतीनुरूप तत्काळ साकरल्या जातात ‘श्री’च्या मूर्ती!  पर्यावरण रक्षणाकरिता शिक्षकाचा उपक्रम  गणरायाची हव्या त्या रूपात मातीची मूर्ती बनवून तत्काळ विक्री 

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: तुम्हाला हव्या असलेल्या रूपात श्री गणेशाची मातीची  मूर्ती बनवून तत्काळ विक्री करण्याचा उपक्रम शिरपूर येथील  जिल्हा परिषदेवरील शिक्षकाने शुक्रवारी राबविला. ऑर्डर  दिल्यानुसार तत्काळ गणेशाची मातीची मूर्ती बनवून ग्राहकांना  देण्यात येत होती. 
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीपासून मोठय़ा प्रमाणात जलप्रदूषण  होत असल्यामुळे पर्यावरण रक्षणाकरिता श्री गणेशाच्या मातीच्या  मूर्तीची स्थापना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पर्यावरण पूरक गणेशाच्या मूर्ती बाजारात उपलब्ध नसल्यामुळे अनेकांची  इच्छा असल्यावरही पीओपीच्याच मूर्तीची स्थापना करावी लागते;  मात्र यावर तोडगा काढत शिरपूर येथील जिल्हा परिषद शाळेवरील  कलाशिक्षक सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  शुक्रवारी मातीच्या मूर्ती बनवून विक्री करण्यास सुरुवात केली.  विशेष म्हणजे ते ग्राहकाला ज्या स्वरूपात हवी त्या स्वरूपात श्री  गणेशाची मूर्ती हातोहात तत्काळ बनवून देत होते. त्यानंतर ग्राहक  सदर मूर्ती खरेदी करीत होता. ग्राहकांना भुर्दंड पडू नये मूर्तीचे दरही  त्यांनी अल्प ठेवले होते. जशजशी भाविकांना याबाबत माहिती हो त गेली तसतशी त्यांच्या दुकानापुढील गर्दी वाढत होती. पर्यावरण  रक्षणाचा हेतू साध्य करण्याकरिताच आपण सदर उपक्रम राबवित  असल्याचे देशमुख यांनी सांगितले.   

Web Title: The image of 'Shri' is done immediately after the customer's choice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.