प्रलंबित, वादग्रस्त शेतरस्ते तात्काळ मोकळे करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:43 AM2021-06-09T04:43:04+5:302021-06-09T04:43:04+5:30
शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. मात्र, प्रलंबित व वादग्रस्त असलेल्या शेतरस्त्याची कामे झालेली नसल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या ...
शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. मात्र, प्रलंबित व वादग्रस्त असलेल्या शेतरस्त्याची कामे झालेली नसल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसह शेतमालाची ने-आण करण्यासाठी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. केवळ अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी मज्जाव केला जात असल्याच्या घटनासुध्दा घडत आहेत. याबाबतच्या तक्रारींचाही निपटारा झालेला नाही. महसूल विभागासह पोलिसांतदेखील अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी असताना याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या निवेदनाव्दारे करण्यात आला आहे. याबाबत तात्काळ न्यायनिवाडा करण्यासाठी शेतकरी सप्ताह राबविण्यात यावा व प्रलंबित व वादग्रस्त शेतरस्त्यांच्या समस्या सोडवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारासुध्दा या निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. यावेळी शिवसेना व युवासेनेचे आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.