भाविक-भक्तांच्या जल्लोषात विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 11:54 PM2017-09-05T23:54:23+5:302017-09-05T23:55:20+5:30
लोणार तालुक्यात मागील १२ दिवसांपासून भाविक-भक्तांच्या सानिध्यात असलेला विघ्नहर्ता श्री गणेशाला भाविकांनी ५ सप्टेंबर रोजी जल्लोषात गणेशाला निरोप दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार: तालुक्यात मागील १२ दिवसांपासून भाविक-भक्तांच्या सानिध्यात असलेला विघ्नहर्ता श्री गणेशाला भाविकांनी ५ सप्टेंबर रोजी जल्लोषात गणेशाला निरोप दिला.
ग्रामीण भागासह शहरी भागात भक्तांच्या सानिध्यात असलेल्या श्री गणेशाला निरोप देण्यासाठी विविध गणेश मंडळांकडून जय्यत तयारी करण्यात आली होतीे. यासाठी नगर परिषद व पोलीस प्रशासनाची यंत्रणा सज्ज राहिली. गणेश मंडळांनी विविध उपक्रम राबवून गणेशो त्सव साजरा केला. ५ सप्टेंबर रोजी गणेशाला निरोप देण्यात येणार असल्यामुळे जय्यत तयारी करण्यात आली होती. कायदा व सुव्यवस् था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने मेहनत घेतली तर मिरवणुकीच्या नियंत्रणाकरिता नगर परिषद यांच्यासह काही स्वयंसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी सज्ज राहिले. गेल्या तीन-चार दिवसांपासून विसर्जन मिरवणुकीची तयारी नगर परिषद नगराध्यक्ष भूषण मापारी यांनी संबंधित प्रशासनाचे सहकार्य घेत केली. सुरक्षेच्या दृष्टीने मिरवणुकीचे चित्रीकरण करण्यात आले. आठ ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आले होते, त्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. एकीकडे जल्लोष आणि उत्साहाला उधाण आलेले असतानाच दुसरीकडे एका मूर्तिकारांचे मन गणरायाच्या विसर्जनामुळे अक्षरश: हळहळलेले दिसून आले. प्राण ओतून सुबक अशी घडविलेली सुंदर कला विसर्जित केली जाते. मू िर्तकारांसह शेकडो भाविकाना दु:ख अनावर होताना दिसले. बाप्पाच्या आगमन काळात असलेले आनंददायी वातावरण त्याच्या विसर्जनामुळे अचानकपणे लुप्त होते; पण तरीही पुन्हा नवा उत्साह, प्रेरणा घेऊन तो पुढच्या वर्षी येतोच, अशी मनाला समजूत घालत भाविकांनी श्री गणेशाचे विसर्जन केले. तर अनेक ग्रामपंचायतींनी एक गाव एक-गणपतीची स्थापना केली होती. यावेळी ग्रामस्थांनी एकत्र येत विविध सांस्कृतिक तसेच स्पर्धात्मक कार्यक्रम घेऊन गणेश उ त्सव साजरा केला. तर आज गणरायाला निरोप देण्यात आला.