गणेश मूर्तींच्या विसर्जन रथात संकलन करून केले विधिवत विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:38 AM2021-09-21T04:38:25+5:302021-09-21T04:38:25+5:30
बालाजी महाराज संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामध्ये या विसर्जन रथाचे सुशोभीकरण करण्यात आले. श्रींच्या विसर्जनासाठी ...
बालाजी महाराज संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामध्ये या विसर्जन रथाचे सुशोभीकरण करण्यात आले. श्रींच्या विसर्जनासाठी रथामध्ये विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रयोग म्हणून शहरातील आदर्श कॉलनी व राजलक्ष्मी नगर येथे विसर्जन रथ फिरवण्यात आला. या भागातील नागरिकांचे प्रबोधन करून त्यांच्याकडून श्रींच्या मूर्ती संकलित करण्यात आल्या. त्या मूर्तींचे आदर्श कॉलनी येथील नगरपरिषदेच्या विहिरीमध्ये विधिवत विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी पूजेसाठी वापरले गेलेले निर्माल्यही संकलित करून त्याचे योग्य ते व्यवस्थापन करण्यात आले. या उपक्रमासाठी महाविद्यालयातील पर्यावरण संवर्धन समिती प्रमुख प्रा. नीलेश काकडे यांच्यासह समिती सदस्य डॉ. महेंद्र साळवे, प्रा. ज्ञानेश्वर शिंब्रे व डॉ. गजानन तांबडे यांनी परिश्रम घेतले.