सहा लाख जनावरांचे लसीकरण

By admin | Published: October 3, 2016 02:45 AM2016-10-03T02:45:30+5:302016-10-03T02:45:30+5:30

विभागातील पाच जिल्ह्यात ५ लाख ९९ हजार ५४0 जनावरांचे लसीकरण करण्यात आले.

Immunization of six lakh animals | सहा लाख जनावरांचे लसीकरण

सहा लाख जनावरांचे लसीकरण

Next

बुलडाणा, दि. 0२- पाळीव जनावरांमध्ये होणार्‍या विविध आजारांना आळा घालण्यासाठी लसीकरण मोहीम विविध पशू चिकित्सालय कार्यालयांतर्गत पावसाळ्यातील चार महिने राबवण्यात आली. या मोहिमेत अकोला विभागात ५ लाख ९९ हजार पशूंचे लसीकरण करण्यात आले. पावसाळ्यात जनावरांना अनेक आजार होतात. त्यामुळे पशुधन दगावण्याची शक्यता असते, तसेच पाळीव प्राण्यांच्या दुधावर परिणामही होतो. त्यामुळे या जनावरांचे मान्सूनपूर्व लसीकरण करण्यात येते. यंदा एप्रिल ते सप्टेंबर अखेरपर्यंंत यासाठी मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील पशुधनाचे संवर्धन व्हावे, शेतकर्‍यांना त्याचा लाभ व्हावा, या उद्देशातून विभागातील पाच जिल्ह्यात ५ लाख ९९ हजार ५४0 जनावरांचे लसीकरण करण्यात आले. यात जनावरांना होणार्‍या लाळ्या खुरकूत, घटसर्प, आणि एकटांग्या, फाशी व काळीपुळी, आंत्रविषार, आदी संसर्गजन्य आजारासाठी लसीकरण करण्यात आले.

मनुष्यांनाही धोका
जनावरांमध्ये विविध प्रकारचे संसर्गजन्य आजार आढळून येतात. बहुसंख्य आजार हे विषाणूजन्य आहेत. या आजारावर हमखास इलाज नसल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण आवश्यक आहे. रेबीज, फाशी, काळीपुळी, ब्रुसेलोसिस, देवी, क्षयरोग आदी रोग हे जनावरांपासून मनुष्यांना होतात. त्यामुळेही जनावरांचे लसीकरण गरजेचे आहे.

जिल्हा          जनावरांची
                     संख्या

अकोला          १0३४0१
बुलडाणा         ११६८४५
वाशिम            ५४४५८
अमरावती       १३४७३८
यवतमाळ        १९00९८

Web Title: Immunization of six lakh animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.