कृषिपंप वीजजोडणी धोरणाची अंमलबजावणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:34 AM2021-03-10T04:34:21+5:302021-03-10T04:34:21+5:30

याप्रसंगी बुलडाणा महावितरणचे कार्यकारी अभियंता नितीनकुमार माळोदे यांनी वीज धोरणाविषयी शेतकरी बंधू- भगिनी महावितरणची भूमिका समजावून सांगितली. यावेळी ...

Implementation of agricultural pump connection policy started | कृषिपंप वीजजोडणी धोरणाची अंमलबजावणी सुरू

कृषिपंप वीजजोडणी धोरणाची अंमलबजावणी सुरू

googlenewsNext

याप्रसंगी बुलडाणा महावितरणचे कार्यकारी अभियंता नितीनकुमार माळोदे यांनी वीज धोरणाविषयी शेतकरी बंधू- भगिनी महावितरणची भूमिका समजावून सांगितली. यावेळी व्यवस्थापक मंडल कार्यालय विकास बांबल, उपकार्यकारी अभियंता अशोक लाहोडे यांनी शेतकऱ्यांना कृषिपंप धोरणाविषयी सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस. एम. थानवी, उप व्यवस्थापक पौर्णिमा कदम, सहायक अभियंता गायकवाड, श्याम पदमने, जे.व्ही. नाडार, जनमित्र जोमाळकर, के. एम. वरखडे यांची उपस्थिती होती. यावेळी चौथा गावातील १७ शेतकऱ्यांनी आपले चालू वीज देयक भरून व चार शेतकऱ्यांनी संपूर्ण थकबाकी देयक भरून या योजनेचा लाभ घेतला व त्यांना थकबाकीमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. दोन महिला शेतकरी भगिनींना महिला दिनाच्या औचित्यावर ए. जी. कोटेशन देण्यात आले व एका महिलेने कोटेशनचा भरणा केल्यामुळे त्वरित वीजजोडणी देण्यात आली.

Web Title: Implementation of agricultural pump connection policy started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.