गोवंश हत्याबंदी निर्णयाची अंमलबजावणी
By admin | Published: March 10, 2015 02:02 AM2015-03-10T02:02:00+5:302015-03-10T02:02:00+5:30
मेहकर येथे खाटीक समाजाचा कत्तलखाने बंदचा करण्याचा निर्णय.
मेहकर (जि. बुलडाणा) : महाराष्ट्र शासनाने गो-वंश हत्याबंदीचा निर्णय लागू केल्याने रविवारी ये थील गुरांच्या बाजारात जनावरांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले नाहीत, तर सोमवारपासून खाटीक समाजाने जनावरांची कत्तल न करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे १९ वर्षांपासून रखडलेल्या गो-वंश हत्याबंदी कायद्यावर गेल्या आठवड्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केल्याने हा कायदा राज्यात लागू करण्यात आला; मात्र अद्यापपर्यंत गॅझेटमध्ये या कायद्याची प्रसिद्धी न झाल्याने अंमलबजावणीत अडथळे निर्माण होणार आहेत. राज्यशासनाच्या गो-वंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी मेहकर शहरातही होत आहे. शहरातील खाटीक समाजाने सोमवारपासून १00 टक्के कत्तलखाने बंदचा निर्णय घेतला आहे. याशिवाय जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गो-वंश हत्याबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी मांस विक्रीची दुकाने बंद दिसून येत आहेत.