प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची अंमलबजावणी आता जिल्हास्तरावरून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:04 AM2021-02-06T05:04:20+5:302021-02-06T05:04:20+5:30
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा ...
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सु. रा. झळके, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व्ही. बी. बचाटे, आयटीआयचे प्राचार्य पी. के. खुळे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा एस. ए.चोपडे, नगर परिषदेचे महेंद्र सोभागे, गजानन गोरीवाले, आत्माचे बिपीनकुमार राठोड, सहायक आयुक्त स. इ. नायकवाडी, व्यवस्थापक सुनील पाटील, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, सहायक आयुक्त कौशल्य विकास कार्यालयाचे पी. एम. खोडे आदी उपस्थित होते. सभेत जिल्ह्यामधील गरजू, दिव्यांग, अनाथ, शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांना, विधवा, परितक्त्या स्त्रियांना या योजनेमध्ये प्रामुख्याने प्राधान्य देण्याचे निर्देश तसेच जिल्ह्यातील गरजू व पात्र उमेदवारांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले. या सभेचे आयोजन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याद्वारे करण्यात आले होते. यावेळी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सु. रा. झळके यांनी आभार मानले. योजनेबाबत अधिक माहिती करीता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर संपर्क करावा, असे आवाहन कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे करण्यात आले आहे.