एसटी बस ग्रामीण भागासाठी महत्त्वाचा दुवा - राम डहाके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:24 AM2021-07-18T04:24:59+5:302021-07-18T04:24:59+5:30
शेलसूर : ग्रामीण भागातील जनतेच्या दैनंदिन दळणवळणासाठी एसटी बस महत्त्वाचा दुवा असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ...
शेलसूर : ग्रामीण भागातील जनतेच्या दैनंदिन दळणवळणासाठी एसटी बस महत्त्वाचा दुवा असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव राम डहाके यांनी व्यक्त केले. ते मंगरुळ नवघरे ते शेलसूर बस फेरीचा शुभारंभ करताना बाेलत हाेते. या वेळी राम डहाके व तालुका काँग्रेसचे अध्यक्ष समाधान सुपेकर यांच्या हस्ते बसचे पूजन करून चालक व वाहकांचा सत्कार करण्यात आला.
ग्रामीण भागातील जनतेला दैनंदिन व्यवहार, वृद्धांना तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कामासाठी, रुग्णांना आरोग्य सुविधेसाठी, विद्यार्थ्यांना शिक्षणासह जीवनावश्यक गरजांसाठी शहरात जावे लागते. परिवहन बसेसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना व विद्यार्थ्यांना प्रवास भाड्यामध्ये सवलत मिळते. या सर्व बाबी बघता चिखली दहिगाव, मंगरूळ नवघरे, कळंबेश्वर मार्गे मेहकर व चिखली पेठ शेलसुर, डोंगरखंडाळा मार्गे बुलडाणा या दोन महत्त्वाच्या बस फेऱ्या सुरू करण्यासंदर्भात नागरिकांनी आ. राहुल बोन्द्रे यांच्याकडे मागणी केली होती. ग्रामीण भागातील नागरिकांच्या मागणीनुसार महामंडळाकडे पाठपुरावा केला असता नवीन बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या. या बस फेरींचा शुभारंभ १५ जुलै राेजी करण्यात आला़ या बसचे सकाळी ९ वाजता मंगरूळ येथे तर दुपारी २ वाजता शेलसुर येथे गावकरी व प्रवाशांच्या उपस्थितीत पूजन करून वाहन चालकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव राम डहाके, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष समाधान सुपेकर, भास्करअण्णा धमक, विलास मगर, अशोक पाटील, काळे मामा, प्रकाश तांगडे, समाधान वायाळ, तर शेलसुर येथे रविअण्णा काळे, विजय धंदर, सुनीलभाऊ धुंदळे, राहुल व्यवहारे, श्यामभाऊ देशमुख यांसह मंगरूळ नवघरे व शेलसुर येथील बहुसंख्य गावकरी व प्रवासी बांधव उपस्थित होते.