बस चालकाने केले होतं मद्यप्राशन?; मालकानं दुर्लक्ष केल्याचा प्रवाशांचा आरोप

By निलेश जोशी | Published: July 29, 2023 11:48 AM2023-07-29T11:48:52+5:302023-07-29T11:49:13+5:30

अपघातामधील २० जखमींवर बुलढाण्यात उपचार सुरू; बहुतांश जखमी हिंगोली जिल्ह्यातील: जखमीमध्ये नागपूरमधील महिलेचाही समावेश

In Buldhana Bus Accident: Was the bus driver drunk?; Passengers allegation of neglect by the owner | बस चालकाने केले होतं मद्यप्राशन?; मालकानं दुर्लक्ष केल्याचा प्रवाशांचा आरोप

बस चालकाने केले होतं मद्यप्राशन?; मालकानं दुर्लक्ष केल्याचा प्रवाशांचा आरोप

googlenewsNext

नीलेश जोशी/हनुमान जगताप

बुलढाणा/मलकापूर: अंमरनाथ वरून हिंगोलीला जाणाऱ्या खासगी प्रवाशी बस व नाशिककडे जाणाऱ्या दुसऱ्या खासगी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातातील २० जखमींवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयत उपाचर करण्यात येत आहे. या अपघातामध्ये ६ जण ठार झाले असून २५ जण जखमी झाले आहेत. यातील पाच जण गंभीर जखमी आहेत.

अमरनाथवरून हिंगोलीला जाणाऱ्या एमएच-०८-९४५८ आणि नागपूर वरुन नाशिककडे जात असलेल्या एमएच-२७-बीएक्स ४४४६ क्रमांकाच्या या दोन्ही खासगी प्रवाशीबसमध्ये हा अपघात झाला. हा अपघात इतका भिषण होता की हिंगोलीकडे जाणारी खासगी प्रवाशी बस अक्षरश: नाशिकडे जाणाऱ्या खासगी बसने धडक दिल्याने चालकाच्या बाजूने चिरत गेली. त्यामुळे अपघाताची भिषणता वाढली होती. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मलकापूरनजीकच्या रेल्वे उड्डाणपूलावर शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडला.

अपघातामधील मृतक
या अपघातामध्ये सहा जण ठार झाले असून सर्व मृतक हे हिंगोली जिल्ह्यातील आहेत. यामध्ये बसचालक संतोष आनंदराव जगताप (रा. भांडगाव), राधाबाई सखाराम गाढे (रा. जयपूर), बसमध्ये आचारी असलेले अर्चना गोपाल घुकसे आणि सचिन शिवाजी महाडे (दोघेही रा. लोहगाव), बसचा मालक शिवाजी धनाजी जगताप (रा. भांडेगाव) आणि कानोपात्रा गणेश टेकाळे (रा. सिंधीनाला, ता. हिंगोली) यांचा समावेश आहे. कानोपात्रा टेकाळे यांना गंभीर अवस्थेत बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयत हलविण्यात आले असता  वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव हे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवागारात  ठेवण्यात आले

२० जखमींवर उपचार
जिल्हा सामान्य रुग्णालयात अपघातामधील जखमी मेनका विष्णु खुळे (३०, रा. लोहगाव), द्वारकाबाई गजानन रोडगे (३०, रा. जामरून, हिंगोली), महादेव संभा रणबळे (५०, रा. खंडाळा), गंगाराम गीते (६३, रा. शिमगीनागा, सेनगाव), संतोष भिकाजी जगताप (५४, रा. भांडेगाव), भगवान नारायन गिते (४८, रा. शिमगीनाका, सेनगाव), राधा नाथा घुकसे (३२, रा. लोहगाव), लिलाबाई एकनाथ आसोले (३३, रा. काळेगाव), पार्वती काशिनाथ ठोकळे (६०, सेनगाव), बद्रीनाथ संभाजी कऱ्हाळे (५४, रा. दिग्रस कऱ्हाळे), गिरीजाबाई बद्रीनाथ कऱ्हाळे (५०, रा. दिग्रस कऱ्हाळे), बेबीताई कऱ्हाळे (५०, रा. डिग्रस कऱ्हाळे), हनुमंत संभाजी फाळके (२६, जयपूर), काशीराम महाजी गिते (४०, रा. सेनगाव), भागवत पुंजाजी फाळके (२८, रा. जयपूर वाडी), किसन नामाजी फसाटे (६०, रा. शिमगीनाका), गणेश शिवाजी जगताप (३८, रा. भांडेगाव), उमाकांत महादजी येवले (३९, रा. शिवनी, ता. सेनगाव) यांच्यावर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमीपैकी बेबीबाई बद्रीनाथ कऱ्हाळे आणि गिरजाबाई बद्रीनाथ कऱ्हाळे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे. संगीता पोद्दार (४२, रा. नागपूर) या नागपूरवरून नाशिकडे जाणाऱ्या खासगी बसमधील प्रवाशी असून एका शाळेत त्या प्राचार्य आहेत तर विक्रांत अशोक समरीत (२८, रा. अमरावती) हा जखमी एमएच-२७-बीएक्स ४४४६ या बसचा चालक आहे. या सर्व जखमींवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

१० जुलै रोजी सुरू केली होती धार्मिक यात्रा
हिंगोली जिल्ह्यातून जवळपास ४० जणांनी १० जुलै रोजी त्यांची धार्मिक यात्रा सुरू केली होती. विदर्भ पंढरी शेगावमध्ये गजानन महाराजांचे त्यांनी प्रथम दर्शन घेतले होते. त्यानंतर मुक्ताईनगर, अमृतसर, वाघा बॉर्डर, अेांकारेश्वर, उज्जैन, मथुरा येथे जाऊन ते परततीच्या प्रवासासाठी निघाले होते. दरम्यान मलकापूर शहरानजीक त्यांच्या खासगी बसला रेल्वे उड्डाणपूला जवळ हा अपघात झाला.

जिल्हाधिकाऱ्यांनी केली जखमींची विचारपूस
बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. सोबतच उपचार झाल्यानंतर पुर्ण बरे वाटत असलेतर जखमींनी सुट्टी घ्यावी, असे स्पष्ट केले. दुसरीकडे खासगी प्रवाशीबस महामार्गावर ज्या ठिकाणी थांबतात तेथे मद्य मिळणार नाही, याच्या दृष्टीने पूर्ण आम्ही प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. प्रामुख्याने ढाब्यांवर अशी सुविधा दिल्या जात असल्याबाबत अेारड आहे.

बस चालकाने केले होत मद्यप्राशन?
नागपूरकडून नाशिककडे जाणाऱ्या बसच्या चालकाने मद्यप्राशन केल्याची प्रवाशांची अेारड होती. अमरावतीपासून २० किमी पुढे आल्यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास एमएच-२७-बीएक्स ४४४६ या बस जेवणासाठी थांबली होती. येथे बसच्या चालकाने मद्यप्राशन केले होते. त्यामुळे बसमधील काही प्रवाशांनी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात फोन करून चालक दुसरा ठेवावा, अशी मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची अपघातामधील जखमी प्रवाशांचे म्हणणे होते.

Web Title: In Buldhana Bus Accident: Was the bus driver drunk?; Passengers allegation of neglect by the owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात