बुलढाणा जिल्ह्यात दहावीच्या निकालात मुलींचीच बाजी

By संदीप वानखेडे | Published: May 27, 2024 03:06 PM2024-05-27T15:06:30+5:302024-05-27T15:06:59+5:30

बुलढाणा जिल्ह्याचा निकाल ९५.३६ टक्के लागला आहे. अमरावती विभागात बुलढाणा जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. इयत्ता बारावीप्रमाणेच दहावीतही मुलींनीच बाजी मारली आहे.

In Buldhana district, 10th class results | बुलढाणा जिल्ह्यात दहावीच्या निकालात मुलींचीच बाजी

बुलढाणा जिल्ह्यात दहावीच्या निकालात मुलींचीच बाजी

बुलढाणा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेला इयत्ता दहावीचा निकाल साेमवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा निकाल ९५.३६ टक्के लागला आहे. अमरावती विभागात बुलढाणा जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. इयत्ता बारावीप्रमाणेच दहावीतही मुलींनीच बाजी मारली आहे.

जिल्ह्यात इयत्ता दहावीसाठी ४० हजार २८७ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली होती. त्यापैकी ३९ हजार ९८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. त्यापैकी ३८ हजार १२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याची एकूण निकालाची टक्केवारी ९५.३६ टक्के अशी आहे. तसेच नियमित विद्यार्थ्यांची टक्केवारी ही ९५.६२ टक्के आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९७.०२ टक्के लागला आहे तर मुलांचा निकाल ९३.९९ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील २० हजार ६०९ मुले तर १७ हजार ५१८ मुलींनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला. काॅपीमुक्त अभियानानंतरही जिल्ह्याचा निकाल चांगला लागला आहे.

१७ हजार ८१७ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत
जिल्ह्यातील ३९ हजार १७४ नियमित विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली हाेती. त्यापैकी १७ हजार ८१७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच १२ हजार २६६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ६ हजार २६७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. १ हजार २३७ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
तालुकानिहाय निकाल
तालुका टक्केवारी
बुलढाणा ९५़०३
माेताळा ९६.६२
चिखली ९६.९१
देऊळगाव राजा ९६. ४७
सिंदखेडराजा ९८.१२
लाेणार ९६.०३
मेहकर ९६.५२
खामगाव ९६़ ५२
शेगाव ९५.२२
नांदुरा ९१.७२
मलकापूर ९४.९७
जळगाव जामाेद ९३.१८
संग्रामपूर ९२.११

Web Title: In Buldhana district, 10th class results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.