एक किलो मिठाची तब्बल १२ हजार २०० रूपयाला विक्री; भंडाऱ्याचे साहित्य विक्रीची अनोखी परंपरा 

By ब्रह्मानंद जाधव | Published: September 11, 2022 06:31 PM2022-09-11T18:31:26+5:302022-09-11T18:32:46+5:30

बुलढाणा जिल्ह्यात एक किलो मिठाची १२ हजार २०० रूपयाला विक्री झाली आहे. 

In buldhana district, one kg of salt has been sold for 12 thousand 200 rupees | एक किलो मिठाची तब्बल १२ हजार २०० रूपयाला विक्री; भंडाऱ्याचे साहित्य विक्रीची अनोखी परंपरा 

एक किलो मिठाची तब्बल १२ हजार २०० रूपयाला विक्री; भंडाऱ्याचे साहित्य विक्रीची अनोखी परंपरा 

googlenewsNext

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात एक किलो मिठाची विक्री तब्बल १२ हजार २०० रूपयांना करण्यात आली आहे, तर अर्धा किलो मिठाच्या पिशव्या १ हजार १० रुपयाला विकण्यात आल्या आहेत. मीठ विक्रीचा हा प्रकार ऐकूण कोणालाही आश्चर्य वाटेल. परंतु ही विक्री एखाद्या किराणा दुकानातील नव्हे, तर मेहकर तालुक्यातील नायगाव दत्तापूर मंदिरातील भंडाऱ्याच्या उरलेल्या साहित्याची आहे. भंडाऱ्याचे साहित्य विक्रीसाठी बोली लावण्याची परंपरा नायगाव वासी अनेक वर्षांपासून जपत आहेत.

मेहकर तालुक्यातील नायगाव दत्तापूर येथील हनुमान मंदिरात पूर्वीपासुन आषाढी एकादशीला एक महिना पोथी पारायणाची परंपरा आहे. त्याचठिकाणी गणेशाची स्थापना व विसर्जनावेळी अमृत योग म्हणून सर्व गावकऱ्यांकडून गहू, तांदूळ आणि तूर दाळ वर्गणी 
जमा करण्यात आली. संपूर्ण गावाचा १० क्विंटलचा भंडारा येथे गोळा होतो. त्यात सर्व गावकरी आनंदाने सहभागी घेत असतात. परंतु मंदिराची योग्य बांधणी व विकास करण्यासाठी सहा नवयुवक मंडळी येथे आतोनात प्रयत्न करत आहे. त्याठिकाणी मंदिराचे पुजारी म्हणून येथील गजानन तुकाराम निकम हे निशुल्क स्वरूपात आपली अखंड सेवा देत आहे. 

१७० वर्षाची परंपरा आजही जोपासत पारायणाची सांगता व गणरायाची मिरवणूक शुक्रवारी पार पडली. टाळांच्या गजरात व मृदंगाच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. अगंणात सडे-रांगोळी काढत फुलांचा वर्षाव करत मिरवणुकीचे स्वागत झाले. संपूर्ण दिवस भक्तिमय होऊन १० सप्टेंबर रोजी १० क्विंटलचा भंडारा सर्व गावकऱ्यांच्या सहभागातून पार पडला. ११ सप्टेंबर रोजी उरलेल्या धान्याची सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत हराशी पार पडली. यात मंदिराचे भंडाऱ्यातील उरलेले धान्य बाजार भावापेक्षा दहा पटीने जास्त दरात विकत घेण्यासाठी गावकऱ्यांमध्ये चढा-ओढ पाहायला मिळाली. 

अशी झाली विक्री
महाप्रसादाच्या उरलेल्या धान्यातून एक किलो मिठाची थैली येथील सुधाकर तोताराम शेळके यांनी १२ हजार २०० रुपयात घेतली. गहु धनंजय र. निकम यांनी ४ हजार ८५० आणि १०० ग्राम पावडर पिशवी १ हजार २५० रुपयाला घेतली. अर्धा किलो प्रत्येकी मिठासाठी शरद ना. निकम यांनी १ हजार १० रुपये, रामदास ते.निकम ७८० रुपये, दिलीप ज.निकम ५०० रुपये, प्रविण ना.निकम ३५० वाढिव रक्कम बऱ्याच भाविकांनी दिली. मंदिराला एक हातभार लावण्याचे काम दरवर्षी येथे गावकरी मोठ्या आनंदाने करत असतात.


 

Web Title: In buldhana district, one kg of salt has been sold for 12 thousand 200 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.