काका काकूच्या हत्येचा प्रयत्न करणारा पुतण्या दोषी; कोर्टानं निकाल राखून ठेवला

By अनिल गवई | Published: February 14, 2023 07:56 PM2023-02-14T19:56:04+5:302023-02-14T19:56:14+5:30

खामगाव जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षेचा निकाल राखून ठेवला

In Buldhana Nephew Convicted of Attempting to Kill Uncle; The court imposed the sentence | काका काकूच्या हत्येचा प्रयत्न करणारा पुतण्या दोषी; कोर्टानं निकाल राखून ठेवला

काका काकूच्या हत्येचा प्रयत्न करणारा पुतण्या दोषी; कोर्टानं निकाल राखून ठेवला

Next

खामगाव: पूर्ववैमनस्यातून तालुक्यातील लाखनवाडा येथील काका-काकूच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ््या पुतण्यास खामगाव जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी दोषी ठरविले. शिक्षेचा निर्णय राखून ठेवत न्यायालयाने मंगळवारी कामकाज तहकूब केले.

हिवरखेड पोलीस स्टेशनतंर्गत लाखनवाडा येथे पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली होती. त्यावरून पोलिसात गुन्हे दाखल झाले होते. घटनेच्या दिवशी प्रल्हाद शिवराम पाचपोर आणि त्यांचा भाऊ समाधान शिवराम पाचपोर यांच्यात २१ जून रोजी भांडण सुरू होते. दरम्यान, साडेसात वाजताच्या दरम्यान, अरविंद प्रल्हाद पाचपोर तेथे ट्रॅक्टर घेऊन आला. त्यावेळी त्याचे वडील प्रल्हाद पाचपोर यांनी अरविंदला चिथावणी देत, भावाच्या अंगावर ट्रॅक्टर चालविण्यास सांगितले.

वडिलांच्या सांगण्यावरून अरविंद ट्रॅक्टर वेगात घेत असतानाच, त्याची काकू प्रमिला पतीला वाचविण्यासाठी समोर आली. अरविंदने जीवे मारण्याच्या उद्देशाने दोघांच्या अंगावरून ट्रॅक्टर नेले. यात पायावरून ट्रॅक्टर गेल्याने दोन्ही पती पत्नी गंभीर जखमी झाले. अशी तक्रार घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार अनंता वसंता पांढरे यांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात दिली. तत्पूवीर् जखमींना लाखनवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नंतर अकोला येथील सर्वेापचार रूग्णालया दाखल केले. तेथे जखमींचे बयाण नोंदविल्यानंतर आरोपी प्रल्हाद शिवराम पाचपोर व अरविंद प्रल्हाद पाचपोर दोघेही रा. लाखनवाडा यांच्या विरोधात भादंवि कलम ३०७, ३२६, ५०६, ३४ अन्वये दोषारोप पत्र दाखल केले. न्यायालयाने ११ साक्षीदार तपासले. जखमी पती पत्नी, बयाण नोंदविणारे डॉक्टर व तपास अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. डॉ.कल्याणी पांढरे, आणि तपास अधिकारी सपोनि व्ही. आर. पाटील यांची साक्ष जखमींच्या साक्षीला पूरक असल्याने िजल्हा सत्र न्यायाधीश ए.एस.वैरागडे यांनी एका आरोपीस दोषी ठरविले. खटला सुरू असतानाच दुसरा आरोपी प्रल्हादचा मृत्यू झाला. सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील वसंत भटकर यांनी काम पाहीले. कोर्ट पैरवी नापोकॉ संतोष धनोकार यांनी केली.

जखमींच्या मुलासही पेटवले

सन २०१३ मध्ये आरोपी अरविंद शिवराम पाचपोर आणि त्याचे वडील प्रल्हाद शिवराम पाचपोर यांच्यात वाद सुरू होता. त्यावेळी पितापुत्रांचे भांडण आवरण्यास जखमी पती-पत्नीचा मुलगा शिवाजी गेला होता. त्यावेळी त्याच्यावर दोघा बापलेकांनी पेट्रोल टाकून पेटविले होते. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. ते प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे समजते.

Web Title: In Buldhana Nephew Convicted of Attempting to Kill Uncle; The court imposed the sentence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.