शेतात नांगरटी करीत असताना इसमास शिविगाळ, धमकी; चौघांविरोधात गुन्हा
By अनिल गवई | Updated: May 11, 2024 14:34 IST2024-05-11T14:34:06+5:302024-05-11T14:34:14+5:30
या तक्रारीवरून ग्रामीण पोलीसांनी उपरोक्त चौघांआरोपी विरोधात भादंवि कलम ३४१, ३४७, २९४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

शेतात नांगरटी करीत असताना इसमास शिविगाळ, धमकी; चौघांविरोधात गुन्हा
खामगाव: ठोक्या बटाईच्या शेतात नागरंटी करताना चौघांनी संगनमत करीत अश्लील शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना तालुक्यातील अटाळी शिवारात शनिवारी सकाळी घडली. प्रकरणी चौघांविरोधात ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार निलेश चंपालाल बडदीया ३५ शनिवारी ठोक्या बटाईने केलेल्या अटाळी शिवारातील एका शेतात ट्रॅक्टरने नांगरटी करीत होते. त्यावेळी जमील अहेमद गुलाम हकानी, शकील अहमेद गुलाम हकानी, नूर अहमेद गुलाम हकानी आणि आणखी एका अनोळखी इसम नांगरटी सुरू असताना ट्रॅक्टरसमोर आडवे झाले. त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला असता, चौघांनी अश्लील शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले. या तक्रारीवरून ग्रामीण पोलीसांनी उपरोक्त चौघांआरोपी विरोधात भादंवि कलम ३४१, ३४७, २९४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकॉ मनोज चव्हाण करीत आहेत.