खामगावमध्ये मारहाणीची धमकी देत ६५ हजारांनी लुटले, तीन घरांमध्ये चोरी

By अनिल गवई | Published: July 9, 2023 04:41 PM2023-07-09T16:41:49+5:302023-07-09T16:43:21+5:30

खामगाव शहरापासून हाकेच्या अंतरावर जयपूर लांडे गाव आहे.

In Khamgaon, 65,000 were robbed by threats of beating, theft in three houses | खामगावमध्ये मारहाणीची धमकी देत ६५ हजारांनी लुटले, तीन घरांमध्ये चोरी

खामगावमध्ये मारहाणीची धमकी देत ६५ हजारांनी लुटले, तीन घरांमध्ये चोरी

googlenewsNext

खामगाव : तीन घरांमध्ये चोरट्यांनी धुमाकुळ घातला. शस्त्राच्या धाकावर मारहाण करण्याची धमकी देत सोन्याचांदीच्या दागिन्यांसह ६५ हजाराचा मुद्देमाल लुटून नेला. ही घटना रविवारी मध्यरात्री जयपूर लांडे येथे घडली. यावेळी चोरट्यांच्या मारहाणीतून बचाव करण्यासाठी एका महिलेने अंगावरील दागिने स्वत: काढून चोरट्यांच्या हवाली केले. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले होते.

खामगाव शहरापासून हाकेच्या अंतरावर जयपूर लांडे गाव आहे. या गावातील तीन घरांना चोरट्यांनी आपले लक्ष केले. यामध्ये ओंकार बेलोकार यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला. काठी आणि लोखंडी सळईच्या धाकावर ओंकार बेलोकार आणि त्यांच्या पत्नीच्या अंगावरील दागिने तसेच रोख रक्कम असा ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. यावेळी बेलोकार यांच्या सुरेंद्र नामक मुलाला लोटपाट आणि मारहाण केली. गावातीलच अविनाश नागोराव लांडे यांच्याघरातील सहा हजार रुपये तसेच शिवाजी पांडुरंग लांडे यांच्या घराचा दरवाजा तोडून ०९ हजार रुपये किंमतीचे सोने आणि लक्ष्मी पूजनातील १५०० रुपये असा ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन गेले. याप्रकरणी पंचफुला ओंकार बेलोकार या महिलेच्या तक्रारीवरून शहर पोलीसांनी भादंवि कलम ४५८, ३८०, ४६१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

श्वानपथक दाखल

जयपूर लांडे येथील चोरीची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकासह पोलिसांनी येथे धडक दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
 

Web Title: In Khamgaon, 65,000 were robbed by threats of beating, theft in three houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.