लाठीमाराचे पडसाद मोताळ्यात, राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षांनी घेतलं अंगावर पेट्रोल ओतून

By ब्रह्मानंद जाधव | Published: September 3, 2023 12:27 PM2023-09-03T12:27:00+5:302023-09-03T12:31:42+5:30

अंगावर पेट्रोल घेतल्याने शहरात काही काळ वातावरण चांगलेच तापले

In response to the lathicharge in Motala, the working president of the NCP took it by pouring petrol on his body | लाठीमाराचे पडसाद मोताळ्यात, राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षांनी घेतलं अंगावर पेट्रोल ओतून

लाठीमाराचे पडसाद मोताळ्यात, राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षांनी घेतलं अंगावर पेट्रोल ओतून

googlenewsNext

ब्रह्मानंद जाधव, मोताळा (बुलढाणा) : जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलनात झालेल्या लाठीमाराचे पडसाद मोताळ्यात ३ सप्टेंबर रोजी उमटले. या घटनेच्या निषेधार्थ मोताळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोताळा कार्याध्यक्ष सुनील कोल्हे व माजी उपसभापती रावसाहेब देशमुख यांनी अंगावर पेट्रोल घेतल्याने वातावरण चांगलेच तापले होते.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या शांततामय आंदोलनाला गालबोट लावणाऱ्या पोलिसी अन्यायाविरोधात रविवारी मोताळ्यात महाविकास आघाडीतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह मराठा समाजबांधवानी घोषणाबाजी दिली. दरम्यान, पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. परंतू रास्ता रोको दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे मोताळा कार्याध्यक्ष सुनील कोल्हे व माजी उपसभापती रावसाहेब देशमुख यांनी अंगावर पेट्रोल घेतल्याने एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले. सुरूवातीला त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मोताळा पोलिस स्टेशनला नेण्यात आली.

Web Title: In response to the lathicharge in Motala, the working president of the NCP took it by pouring petrol on his body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.