वीज कर्मचाऱ्यावर हल्ला अन् शासकीय कामात अडथळा प्रकरणी सहामहीने सक्त मजुरी

By अनिल गवई | Published: March 13, 2023 06:50 PM2023-03-13T18:50:15+5:302023-03-13T18:50:36+5:30

वीज कर्मचाऱ्यावर हल्ला अन् शासकीय कामात अडथळा प्रकरणी सहामहीने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 

 In the case of attack on an electricity worker and obstructing government work, the sentence of six months' hard labor has been imposed  | वीज कर्मचाऱ्यावर हल्ला अन् शासकीय कामात अडथळा प्रकरणी सहामहीने सक्त मजुरी

वीज कर्मचाऱ्यावर हल्ला अन् शासकीय कामात अडथळा प्रकरणी सहामहीने सक्त मजुरी

googlenewsNext

खामगाव (बुलढाणा) : वीज बील न भरल्याने वसुली करीता व विदयुतपुरवठा खंडीत करण्याकरीता कर्तव्यावर असलेल्या कर्मचा-याला मारहाण करून शासकिय कामात अडथळा करणा-या आरोपीला सहामहीने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल खामगाव येथील २ रे तदर्थ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश पी. पी. कुळकर्णी यांनी जाहीर केला.

याबाबतची हकीकत अशी की, २६ मार्च २०१८ रोजी वीज कर्मचारी जुनैद शहा त्यांचे सहकारी कर्मचा-यांसोबत वरखेड बु येथे थकीत विज बील वसुली करीता गेले. तेथील ग्राहक कालुखान सत्तारखान, याचेकडे वीज देयक थकीत असल्याने त्याला रकमेची मागणी करण्यात आली. त्याने थकीत रक्कम भरण्यास नकार दिल्याने वीज कर्मचारी त्याचा वीज पुरवठा खंडीत करण्याकरीता इलेक्ट्रीक पोलवर चढत असताना आरोपीने त्याची कॉलर धरून लोटपाट केली. त्याचे हातातील कागदपत्रांची फेकफाक केली, अशी तक्रार फिर्यादीने खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे दाखल केली.

उपरोक्त फिर्यादीवरून पोलीसांनी गुन्हा क्र. २४७/२०१८ दाखल करून स. पो. नि. रामराव चतुरसिंग राठोड यांनी तपास करून दोषारोप पत्र सादर केले. सदर प्रकरणात सरकार तर्फे ४ साक्षदारांची साक्ष नोंदविण्यात आली. पुराव्यावरून व कागदपत्रांवरून आरोपीचा गुन्हा सिध्द झाल्याने आरोपीस ६ महीने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

 

Web Title:  In the case of attack on an electricity worker and obstructing government work, the sentence of six months' hard labor has been imposed 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.