विवेकानंद आश्रमाच्या कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:28 AM2021-05-03T04:28:50+5:302021-05-03T04:28:50+5:30
हॉस्पिटलच्या सर्व सेवा-सुविधांची रायमूलकर यांनी पाहणी करून माहिती घेतली. यावेळी बोलताना आ.रायमूलकर म्हणाले, स्वामी शुकदास महाराजांनी आपल्या रुग्णसेवा कार्यातून ...
हॉस्पिटलच्या सर्व सेवा-सुविधांची रायमूलकर यांनी पाहणी करून माहिती घेतली.
यावेळी बोलताना आ.रायमूलकर म्हणाले, स्वामी शुकदास महाराजांनी आपल्या रुग्णसेवा कार्यातून लाखो रुग्णांना आरोग्य प्रदान केले. विवेकानंद आश्रम प्रशासनाने महाराजांना अभिप्रेत असलेली रुग्णसेवा सुरू केलेली आहे. आज संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातलेले आहे. अशावेळी विवेकानंद आश्रमाने सुरू केलेले कोविड हॉस्पिटल परिसरातील रुग्णांसाठी एक दिलासा ठरणार आहे.
यावेळी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष रतनलाल मालपाणी , उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विश्वस्त पुरुषोत्तम आकोटकर,प्रा. के.के. भिसडे, अशोक गिऱ्हे, पी. वाय. शेळके, विवेकानंद आश्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गिऱ्हे, जनरल फिजीशीयन डाॅ. आशिष चांगाडे, डाॅ.निलेश निकम आदी मंडळी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आ. डाॅ. रायमूलकर म्हणाले, विवेकानंद आश्रमाने सुरू केलेल्या रुग्णसेवेसाठी मी या संस्थेचा माजी विद्यार्थी व आश्रमाचा सदस्य सेवक या नात्याने सर्व रुग्णांची मी नाश्ता भोजनाची जबाबदारी स्वीकारत आहे. तसेच हॉस्पिटलला वेळोवेळी लागणारे सहकार्य मी करीत राहील, असेही ते म्हणाले़