उडीद, मूग, सोयाबीन खरेदी केंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:34 AM2017-11-02T01:34:35+5:302017-11-02T01:34:41+5:30
बुलडाणा : बळीराजा बदलत्या हवामान चक्रामुळे संकटात आहे. कधी जास्त पाऊस, तर कधी पाऊसच नाही, अशी परिस् िथती निर्माण झाली आहे. ऐन पीक बहरण्याच्या काळात पाऊस ये त नाही आणि पक्वतेच्या काळात जास्त पडतो. या परिस्थितीमुळे बळीराजा हवालदिल आहे. अशा संकटसमयी शेतकर्यांना संकटातून मुक्त करण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी उभे आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी, फलोत्पादन व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडीद, मूग व सोयाबीन शेतमाल शासकीय हमीभावाने खरेदी केंद्र, शेतकरी भवन उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती जालींधर बुधवत, माजी आमदार धृपदराव सावळे, जिल्हा उ पनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात, उपसभापती गौतम बेगामी, नगरसेवक जायभाये, सोनोने, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.