जलजागृती सप्हाताचे अधीक्षक अभियंत्यांच्या हस्ते उद्घाटन - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:34 AM2021-03-18T04:34:23+5:302021-03-18T04:34:23+5:30

गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत दहा टक्के वाढ करणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जनप्रबोधनाचे कार्यक्रम ...

Inauguration of Water Awareness Week by Superintending Engineers - A | जलजागृती सप्हाताचे अधीक्षक अभियंत्यांच्या हस्ते उद्घाटन - A

जलजागृती सप्हाताचे अधीक्षक अभियंत्यांच्या हस्ते उद्घाटन - A

googlenewsNext

गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत दहा टक्के वाढ करणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जनप्रबोधनाचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. अधीक्षक अभियंता यांच्या दालनामध्ये जिल्हयातील खडकपुर्णा, पैनगंगा, वान, मन, नळगंगा, पुर्णा, ज्ञानगंगा, विश्वगंगा या प्रमुख नद्यांचे जलपुजन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी नितिन सुपेकर यांनी उपस्थितांना जलप्रतिज्ञा वाचन करुन पाणीबचतीचे महत्व जनतेस पटवून देण्याचे आवाहन केले.

या सप्ताहा दरम्यान १७ ते २१ मार्च या कालावधीत जलजागृती करण्यात येणार आहे. कोवीड संसर्गाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने घालून दिलेल्या नियमांच्या अनुषंगाने ही जनजागृती करावयाची आहे. जलजागृती सप्ताहात पाणीबचती विषयी जनजागृती करणे, विभागाच्या वाहनांवर पोष्टर्स लावणे, पाणीबचती विषयी मान्यवर वक्त्यांचे प्रबोधनपर सेमिनार आयोजित करणे, मान्यवरांच्या पाणी बचत, पाणी वापर संस्था व कालवा स्वच्छता या विषयावर मार्गदर्शन व जागृती करण्यात येणार आहे. बहुतांश कार्यक्रम हे ऑनलाईन पद्धतीने होतील.

या उद्घाटन कार्यक्रमातस पेनटाकळी पाणी वापर संस्थांच्या महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर यांनी पाणीवापर संस्था व जलसंपदा विभाग यांच्या समन्वयाने केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचे महत्व विषद करुन, पाणी ही काळाची गरज असुन, पाणी बचत करणे आवश्यक असल्याचे सांगीतले. उपकार्यकारी अभियंता श्रीमती क्षितीजा गायकवाड यांनी याप्रसंगी गृहीणींनी दैनंदिन काम काजासाठी आवश्यक पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहा.अधिक्षक अभियंता तुषार मेतकर, शाखा अभियंता अनिल खानझोडे, सहा.अधिक्षक अभियंता अंकुश गावित, लघुलेखक भरत राऊत, करण उमाळे, नितीन डब्बे, शत्रुघ्न धोरण, शेख ग्यासुद्दीन आदींनी प्रयत्न केले. सुत्रसंचालन करून आभार मनजीतसिंग राजपूत यांनी मानले. या कार्यक्रमासाठी जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Inauguration of Water Awareness Week by Superintending Engineers - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.