पेरणीवरून हाणामारीच्या घटना वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:24 AM2021-06-26T04:24:29+5:302021-06-26T04:24:29+5:30
माेताळा : खरीप पेरणीचा हंगाम सुरू होताच अनेक ठिकाणी शेतीचे वाद उफाळून येतात. या वादातून कधी-कधी खुनाच्या घटनादेखील घडतात. ...
माेताळा : खरीप पेरणीचा हंगाम सुरू होताच अनेक ठिकाणी शेतीचे वाद उफाळून येतात. या वादातून कधी-कधी खुनाच्या घटनादेखील घडतात. तालुक्यात गत दाेन ते अडीच महिन्यांत शेतीच्या वादावरून दाेन गटांत हाणामारी झाल्याच्या २० घटना घडल्या आहेत़
बोराखेडी पोलीस ठाण्यात १४ तक्रारी तर धामणगाव बढे पोलीस ठाण्यात सहा तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. जसजशी शेतीच्या मशागतीचे दिवस जवळ येत आहेत तसतसे शेतीच्या धुऱ्यावरून शेतीच्या हिस्सेवाटीवरून व शेतरस्त्यावरून वाद होणे अशा शेतीविषयक विवादांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये परस्परविरोधी तक्रारी होण्याच्या घटना तसेच एकतर्फी तक्रारीच्या घटना घडत असतात. विशेष म्हणजे वाद व तक्रारी करणारे हे एकमेकांचे नातेवाईकच आहेत. एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्याचे प्रमाण अधिक दिसून येत आहे.