वादळी पावसाने केळी बागांचे नुकसान!

By admin | Published: June 17, 2017 12:18 AM2017-06-17T00:18:31+5:302017-06-17T00:18:31+5:30

केळी उत्पादक अडचणीत: आधी उन्हाचा, आता वादळी पावसाचा फटका

Inclementual rain loss of banana garden! | वादळी पावसाने केळी बागांचे नुकसान!

वादळी पावसाने केळी बागांचे नुकसान!

Next

हिवराआश्रम : केळी उत्पादकांना या उन्हाळ्यात उन्हाच्या तीव्रतेचा फटका बसला. उन्हाचे प्रमाण जास्त व पाणी कमी पडल्याने केळीचे उत्पादन घटले; त्यात केळीला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे यावर्षी केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले, तर आता पावसाळ्यात अनेक ठिकाणी वादळ- पावसामुळे फडाने भरलेली केळीची झाडेच भुईसपाट होत असल्याचे दिसून येत आहे.पश्चिम वऱ्हाडातील शेतकरी आधुनिक शेतीची कास धरत फळबाग घेण्याकडे वळले आहेत. त्यात केळी या फळबागेकडे सर्वाधिक शेतकऱ्यांचा कल आहे. बुलडाणा, वाशिम व अकोला या तीनही जिल्ह्यामध्ये सिंचनाची सुविधा असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी केळीची लागवड केलेली आहे; परंतु आता केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
उन्हाळ्यात यावर्षी जास्त उन तापल्याने केळीच्या फडांना याचा सर्वाधिक फटका बसला. केळीला उन्हाळ्यात जास्त पाणी लागते; परंतु यावर्षी पाणी कमी पडल्याने उत्पादनातही घट आली. आता पावसाळ्यातही केळी फळबागेचे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान होत आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे केळीची झाडे भुईसपाट झाली आहेत.
केळीला लागलेल्या घडाचेही यामुळे नुकसान झाले आहे. परिणामी, यावर्षी केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

मोडलेल्या झाडांना लाकडाचा आधार
सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने अनेक ठिकाणी केळीची झाडे पडलेली आहेत. त्यामुळे या पडलेल्या केळीच्या झाडांना लाकडाचा आधार देऊन उभे करण्याचे काम सध्या केळी उत्पादक शेतकरी करत आहेत. यामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लाकडाच्या आधारावर केळीची झाडे सोसाट्याच्या वाऱ्यासमोर किती वेळ तग धरतात, याची शाश्वती नसल्याने केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे. शासनाने सर्वेक्षण करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Web Title: Inclementual rain loss of banana garden!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.