खामगाव आगाराला १२ लाखांचे उत्पन्न

By admin | Published: July 13, 2014 11:40 PM2014-07-13T23:40:12+5:302014-07-13T23:40:12+5:30

पढंरपूर यात्रेकरिता एसटीच्या जादा बसगाड्याच्या ४३ फेर्‍यांमधुन आगाराला १२ लाखाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

Income of 12 lakhs to Khamgaon Agra | खामगाव आगाराला १२ लाखांचे उत्पन्न

खामगाव आगाराला १२ लाखांचे उत्पन्न

Next

खामगाव : आषाढी एकादशी निमीत्य विठुमाऊलीच्या दर्शनासाठी पंढरपुरला लाखो भाविक जातात. खामगाव आगारातुन भक्तांसाठी यंदाही पढंरपूर यात्रेकरिता एसटीच्या जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. या बसगाड्याच्या ४३ फेर्‍यांमधुन आगाराला १२ लाखाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
पंढरपूर यात्रेकरुंसाठी खामगाव येथुन विशेष गाड्यांची व्यवस्था सुध्दा करण्यात येत असते. भाविकांचा प्रवास सुखद व्हावा याकरिता प्रयत्न केले जातात. त्याकरिता २३ जुन पासुन तर आता पर्यंंत एकुण ४३ एसटी गाड्या सोडण्यात आल्या आहे. खामगाव बसस्थानकातुन दररोज ४ फेर्‍या सोडण्यात आल्या. आत पर्यंत ३९ हजार ४७४ किलोमिटरचा प्रवास झाला असुन त्याचे उत्पन्न १२ लाख रुपये इतके आहे. पंढरपुर यात्रेकरीता जाण्यार्‍या प्रवाशांकरीता बसस्थानकावर स्वतंत्र यात्रीनिवार्‍याची व्यवस्था करण्यात आली होती. व भक्तांना प्रवासकरीता योग्य माहीती देण्यात आली. पंढरपुर यात्रेकरीता आगार प्रमुख एस.टी.पाटील, सहायक वाहतुक निरीक्षक आर.टी.सदार, बी.ए.दलाल, वाहतुक निरीक्षक जे.व्ही.बोरले, एस.यु. देशमुख यांनी व खामगाव आगारातील चालक व वाहक कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Income of 12 lakhs to Khamgaon Agra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.