घरकुल बांधकामाची रक्कम वाढवा - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:20 AM2021-03-29T04:20:26+5:302021-03-29T04:20:26+5:30
मुक्ताई मंदिरात विविध कार्यक्रम बुलडाणा : गुरुवारी एकादशीनिमित्त बुलडाणा-खामगाव रोडवरील पाळा येथील मुक्ताई मंदिरात विविध पूजाअर्चा करण्यात आली. यावेळी ...
मुक्ताई मंदिरात विविध कार्यक्रम
बुलडाणा : गुरुवारी एकादशीनिमित्त बुलडाणा-खामगाव रोडवरील पाळा येथील मुक्ताई मंदिरात विविध पूजाअर्चा करण्यात आली. यावेळी ह.भ.प. शांताराम महाराज पाळेकर यांचे कीर्तन झाले.
जिल्ह्यातील कामगारांसाठी लढा उभारणार
बुलडाणा : बांधकाम कामगारांच्या अडीअडचणी सोडविण्याचा निर्धार बांधकाम कामगार मजूर संघाच्या वतीने करण्यात आला. संघाची सदस्यता नोंदणी बांधकाम मजूर संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.
संवेदना शिबिरात ३४ युवकांची नोंदणी
मोताळा : तालुक्यातील संवेदना रक्तदाता संघाच्या वतीने गुरुवारी रक्तदानासाठी ३४ युवकांनी नोंदणी केली. कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत रक्ताचा तुटवडा लक्षात घेता, युवकांनी रक्तदानासाठी नोंदणी केली.
कृउबासमध्ये बाजरीची आवक वाढली
बुलडाणा : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती गत आठवड्यापासून बाजरीची आवक वाढली आहे. गुरुवारी बाजरीला १४०० रुपये क्विंटलचा सर्वाधिक भाव मिळाला. गत आठवड्यापासून बाजारात ५ ते ६ क्विंटलची दररोज आवक होत आहे.
बाजारात कैरीला ग्राहकांची पसंती
मोताळा : उन्हाचा प्रकोप वाढत असल्याने, बाजारात कैरीची आवक वाढली असून, मोताळा परिसरातील गावकरी कच्च्या कैऱ्यांना पसंती देत आहेत. ४० ते ६० रुपये किलोप्रमाणे किरकोळ बाजारात कैरी विकली जात आहे.
ग्रामीण रुग्णालयात क्षयरोग दिनानिमित्त कार्यक्रम
मोताळा : क्षयरोग दिनानिमित्त मोताळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरोगदिनी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत, आरोग्य अधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा!
बुलडाणा : मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी. मराठा आरक्षणाबाबत केंद्राकडे बोट दाखवून अंग काढून चालणार नाही. मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपचे विनोद पाटील यांनी केली आहे.
हनुमान चालिसाचे ऑनलाइन पठण
बुलडाणा : कोरोना विषाणू संक्रमण कालावधीत आत्मबल वाढविण्यासाठी आदर्श श्रीराम मंडळाच्या वतीने ऑनलाइन हनुमान चालिसा पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शनिवारी २१ जणांनी यामध्ये सहभाग नोंदविला.
मूलभूत सुविधांचा अभाव
बुलडाणा : स्थानिक चैतन्यवाडीत गत काही दिवसांपासून मूलभूत सुविधांचा अभाव आहे. शहरातील विविध समस्यांकडे पालिका प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.