डेंग्यूसदृश तापाच्या रुग्णांमध्ये वाढ

By admin | Published: September 13, 2014 12:22 AM2014-09-13T00:22:59+5:302014-09-13T00:22:59+5:30

दूषित पाणी व बदलत्या वातावरणाचा परिणाम सिंदखेडराजा तालुक्यात डेंग्यूसदृश तापाच्या प्रादुर्भाव

Increase in dengue fever patients | डेंग्यूसदृश तापाच्या रुग्णांमध्ये वाढ

डेंग्यूसदृश तापाच्या रुग्णांमध्ये वाढ

Next

सिंदखेडराजा : शहरासह तालुक्यात डेंग्यूसदृश तापेचे प्रस्थ वाढले असून, ग्रामीण रुग्णालयासह खासगी रुग्णालये हाऊस फुल झाली आहेत. दूषित पाणी व बदलत्या वातावरणामुळे प्रत्येक घरी ता पेचे रुग्ण फणफणत आहेत. शहरामध्ये डेंग्यूसदृश तापेची साथ सुरू असून, ग्रामीण रुग्णालयामध्ये दररोज तापेचे सुमारे २५0 रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. तर खासगी रुग्णालयामध्येही एका दिवशी सुमारे ५00 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आहे. जालना, देऊळगावराजा येथे उपचारासाठी जाणारे रुग्णही वेगळेच आहेत. शहर व परिसरातील ५ ते ६ रुग्ण जालना येथे उपचारासाठी पाठविण्यात येतात. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण डेंग्यूचे आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Increase in dengue fever patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.