सोन्याच्या भावात वाढ; चांदी मात्र घसरली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 05:31 AM2021-01-21T05:31:45+5:302021-01-21T05:32:33+5:30
चार दिवसांपूर्वी ४९,८५० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात १८ रोजी १५० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार रुपयांवर पोहोचले. दोन दिवस याच भावावर स्थिर राहिल्यानंतर बुधवारी त्यात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.
जळगाव: गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावातील चढ-उतार सुरूच असून बुधवार, दि. २० जानेवारी रोजी सोन्याच्या भावात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५०, २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. मात्र या वेळी चांदीच्या भावात दोन दिवसात ५०० रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे चांदी ६७ हजार रुपये प्रति किलोवर आली.
सट्टाबाजारात खरेदी-विक्री कमी-अधिक होत असल्याने सोने-चांदीच्या भावात चढ-उतार सुरू आहे.
यात चार दिवसांपूर्वी ४९,८५० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात १८ रोजी १५० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार रुपयांवर पोहोचले. दोन दिवस याच भावावर स्थिर राहिल्यानंतर बुधवारी त्यात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.
एकीकडे सोन्याच्या भावात वाढ झालेली असताना चांदीच्या भावात मात्र ५०० रुपयांनी घसरण झाली. १८ रोजी ६७,५०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात १९ रोजी ५०० रुपयांनी घसरण झाली व चांदी ६७ हजार रुपये प्रति किलोवर आली व दि. २० रोजीदेखील याच भावावर ती स्थिर होती.