कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देवून चाचण्या वाढवा- पीयूष सिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:33 AM2021-03-06T04:33:05+5:302021-03-06T04:33:05+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कोविड संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. तेव्हा ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कोविड संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. तेव्हा ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गीते प्रामुख्याने उपस्थित होते.
आयुक्तांनी चाचण्यांच्या दृष्टीने स्वॅब गेण्याचे प्रमाण सर्वच तालुक्यात वाढवावे असे निर्देशित केले. सोबतच ग्रामीण भागातही स्वॅब घेण्याचे प्रमाण वाढविण्याची गरज व्यक्त केली. बाधितांच्या संपर्कातील एकही व्यक्ती सुटता कामा नये, असे ते म्हणाले. बाधीत रूग्णांना कोविड केअर सेंटरलाच भरती करून घ्यावी. होम आयसोलेशनची सुविधा बंदच ठेवावी. होम क्वारंटाईन असलेल्या रूग्णांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारावा. जेणकरून सदर बाधित रूग्ण बाहेर फिरत असल्यास दिसून येईल. ज्या रूग्णांकडे विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था आहे, अशा रूग्णांना होम आयसोलेशन दिले असल्यास त्यांच्या घरावर विलगीकरण केल्याच्या तारखेसह स्टीकर चिकटवावे. आरोग्य यंत्रणेतील सर्व कर्मचाऱ्यांचे टेस्टींग करून घ्यावे. कोविड केअर सेंटरमध्ये सर्व सुविधा असाव्यात. जेवणाचा दर्जा चांगला ठेवावा. स्वच्छतेच्या बाबत कुठलीही तडजोड नसावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
लसीकरणाबाबत आढावा घेताना विभागीय आयुक्त म्हणाले, आरोग्य यंत्रणेतील सर्वांचे लसीकरण करून घ्यावे. सुपर स्प्रेडरच्या कोविड चाचण्या बंधनकारक कराव्यात. शासकीय कार्यालयामधील अधिकारी व कर्मचारी यांच्या नियमित कोरोना चाचण्या कराव्यात, असे ही विभागीय आयुक्त म्हणाले.