साखरखेर्डा परिसरात वाढले तापेचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:37 AM2021-08-27T04:37:28+5:302021-08-27T04:37:28+5:30
साखरखेर्डा येथे आणि परिसरातील शिंदी, मोहाडी, सवडद, राताळी, गुंज, वरोडी, पिंपळगाव सोनारा, शेंदुर्जन, गोरेगाव, उमनगाव, बाळसमुद्र या गावात अनेक ...
साखरखेर्डा येथे आणि परिसरातील शिंदी, मोहाडी, सवडद, राताळी, गुंज, वरोडी, पिंपळगाव सोनारा, शेंदुर्जन, गोरेगाव, उमनगाव, बाळसमुद्र या गावात अनेक रुण तापेणे फणफणत आहेत. साखरखेर्डा येथील खाजगी रुग्णालयात अनेक लहान बालक ६ ते १८ वर्षांखालील मुले तापेने फणफणत असल्याचे दिसून आले. नेमका हा ताप कशाचा ! याची चौकशी केली असता डेग्यू सदृश्य लक्षणे असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. कोरोना संसर्गजन्य आजार कमी झाला असला तरी, सावधानता बाळगण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे. त्यात ताप, खोकला येताच घरात घबराटीचे वातावरण निर्माण होऊन रुग्ण दवाखाना जवळ करीत आहेत. त्यात जागतिक आरोग्य संघटनेने तिसरी लाट शक्य असून, लहान मुलांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. १७ ते २४ ऑगस्ट पर्यंत साखरखेर्डा परिसरात सतत पाऊस झाला. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला. यातच तापेचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी सजग राहाणे गरजेचे झाले आहे.
डासांचा प्रादुर्भाव रोखणे गरजेचे
साखरखेर्डा गाव हे १८ हजार लोकसंख्येचे गाव असून, ज्या भागात काॅक्रीट रस्ता नाही, पाणी वाहण्यासाठी नाली नाही. अशा भागात पाणी रस्त्यावर साचत असून डासांची पैदास येथून होत आहे. तोच प्रकार खेडेगावात ही असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ग्राम पंचायत आणि आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे .
प्रत्येक गावात जाऊन आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करीत आहेत. तापाचे रुग्ण आढळून आले असले तरी ते डेंग्यूचे नाहीत .
-डॉ . संदीप सुरुशे
वैद्यकीय अधिकारी, साखरखेर्डा.