सततच्या पावसाने ताडपत्र्यांच्या विक्रीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:35 AM2021-07-30T04:35:52+5:302021-07-30T04:35:52+5:30
सिमेंटच्या दरवाढीचा बांधकामांना फटका किनगाव राजा : सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या दरात प्रतिबॅग जवळपास २० ते ३० टक्के वाढ केली ...
सिमेंटच्या दरवाढीचा बांधकामांना फटका
किनगाव राजा : सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या दरात प्रतिबॅग जवळपास २० ते ३० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत आला आहे. दरम्यान, ही दरवाढ मागे घेण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांमधून होत आहे.
पीक कर्जासाठी अडवणूक करू नये!
दुसरबीड : पीक कर्ज वाटप करताना शेेतकऱ्यांची अडवणूक आढळून आल्यास त्याविरुद्ध आंंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा लोकप्रतिनिधींकडून देण्यात येत आहे. परंतु अद्यापही पीक कर्जाचा टक्का वाढत नसल्याचे चित्र आहे. अनेक शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकेत चकरा माराव्या लागत आहेत.
डेंग्यू, मलेरिया नियंत्रणात
बुलडाणा : पावसाळ्यात दरवर्षी साथीचे आजार डोके वर काढतात. सध्या कोरोनाचे रुग्ण काहीसे कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. काेराेनाची लाट ओसरली असली, तरी पावसाळ्यातील आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
नाफेडकडे शेतमाल वाढण्याची शक्यता
लोणार : खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत शासनाने वाढ करण्याचा निर्णय मागील महिन्यात घेतला होता. तूर आणि उडदाला ३०० रुपये प्रतिक्विंटल व तिळाला ४५२ रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आलेली असून, यंदा आधारभूत किमतीत जास्तीत जास्त शेतमाल जाण्याची शक्यता आहे.
कोरोना संसर्गात घट, मृत्यू चिंताजनकच
बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचे रुग्ण सापडण्यामध्ये मोठी घट झाली आहे. मात्र मृत्यू चिंताजनकच आहेत. दररोज कोरोनामुळे एक तरी मृत्यू होतच आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त होत आहे.