जिल्ह्यात संततधार पावसाने जलसाठय़ात वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:50 AM2017-09-22T00:50:37+5:302017-09-22T00:51:02+5:30
बुलडाणा: जिल्ह्यात नैरुत्य मान्सून पाऊस सक्रिय झाला असून, सर्वदूर पाऊस होत आहे. पावसाची संततधार जिल्ह्यात सुरू असून, सिंचन प्रकल्पांमधील जलसाठय़ात वाढ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात नैरुत्य मान्सून पाऊस सक्रिय झाला असून, सर्वदूर पाऊस होत आहे. पावसाची संततधार जिल्ह्यात सुरू असून, सिंचन प्रकल्पांमधील जलसाठय़ात वाढ झाली आहे.
बुधवार रात्रीपासूनच बहुतांश ठिकाणी जिल्ह्यामध्ये पाऊस होत आहे. या पावसाचा लाभ जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये होणार आहे. सर्वत्र पाऊस होत असल्यामुळे भुजल पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपयर्ंत महसूल विभागाकडील आकडेवारीनुसार सर्वात जास्त ६३ मि. मी. पावसाची नोंद संग्रामपूर तालुक्यात झाली आहे. जिल्ह्यात सकाळी ८ वाजेपयर्ंत संग्रामपूर तालुक्यात ६३ मि.ली (सरासरी ४८४ मि.ली), चिखली : निरंक (६५३), मेहकर: ३ (६९४), दे.राजा: ११ (६९७), लोणार: ४ (५९२), खामगाव : १५ (५८0.३), शेगाव : २0 (४५८), मलकापूर : २२ (६४९), मोताळा : १९ (६0७), नांदुरा: २३ (६२४.५), जळगाव जामोद : २0 (७0२), सिं.राजा:२४ (६८२.१), बुलडाणा : २४ (९२६) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात एकूण २४८ मि.ली पावसाची नोंद करण्यात आली असून, त्याची सरासरी १९.१ मि.ली आहे. आतापयर्ंत सर्वात जास्त पाऊस बुलडाणा तालुक्यात झाला असून, सर्वात कमी पाऊस शेगाव तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात १ जून २0१७ पासून आतापयर्ंत पडलेल्या पावसाची सरासरी ६४२.२ मि.ली आहे.
नळगंगा ६९ टक्के, पेनटाकळीत ५९.९६ टक्के जलसाठा
बुलडाणा पाटबंधारे विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये गत २४ तासात झालेल्या पावसामुळे जलसाठय़ामध्ये वाढ नोंदविण्यात आली आहे. नळगंगा प्रकल्पामध्ये प्रकल्पीय संकल्पीत साठा : ६९.३२ टक्के, आजचा पाणीसाठा : ३४.५५ टक्के, पेनटाकळी - प्रकल्पीय संकल्पीत साठा : ५९.९७ टक्के, आजचा पाणीसाठा : १७.१0 टक्के, खडकपूर्णा प्रकल्पीय संकल्पीत साठा : ९३.४७, आजचा पाणीसाठा : ५.0५, पलढग प्रकल्पीय संकल्पीत साठा : ७.५१ टक्के, आजचा पाणीसाठा: ८९.६१ टक्के, ज्ञानगंगा - प्रकल्पीय संकल्पीत साठा : ३३.९३ टक्के, आजचा पाणीसाठा: ३८.२५ टक्के, मस : प्रकल्पीय संकल्पीत साठा : १५.0४ टक्के, आजचा पाणीसाठा: २६.९९ , कोराडी : प्रकल्पीय संकल्पीत साठा : १५.१२ टक्के, आजचा पाणीसाठा: ३३.१३ टक्के, मन : प्रकल्पीय संकल्पीत साठा : ३६.८३ टक्के, आजचा पाणीसाठा: २३.३५ टक्के, तोरणा : प्रकल्पीय संकल्पीत साठा : ७.८९ टक्के, आजचा पाणीसाठा: २८.३९ टक्के, उतावळी : प्रकल्पीय संकल्पीत साठा : १९.७९ टक्के, आजचा पाणीसाठा: २४.८६ टक्के.