आरोग्य यंत्रणेवर वाढला ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:34 AM2021-03-20T04:34:13+5:302021-03-20T04:34:13+5:30

कोरोना विषाणूने पुन्हा पाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी स्वतःची व कुटुंबाची पर्वा न करता अहोरात्र ...

Increased stress on the health system | आरोग्य यंत्रणेवर वाढला ताण

आरोग्य यंत्रणेवर वाढला ताण

googlenewsNext

कोरोना विषाणूने पुन्हा पाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी स्वतःची व कुटुंबाची पर्वा न करता अहोरात्र काम करत आहेत. अत्यंत थोडक्या मनुष्यबळावरच सर्व कामे पार पाडत असताना कर्मचाऱ्यांकडून तारेवरची कसरत करून कामे घ्यावी लागत आहे. आरोग्य कर्मचारी व अधिकारी त्यांचे आरोग्य संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या १ तारखेस देण्यात यावे, नियमित व एनएचएम कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोविड केअर सेंटरकरिता संपूर्ण स्टफ एसएम नव्याने भरण्यात यावा, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या ड्युटी लावण्यात येऊ नये, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी एनएचएमअंतर्गत स्टाफ नर्स आणि एलएचव्ही पद तात्काळ भरण्यात यावे, लसीकरणाच्या ठिकाणी एएनएमची संख्या कमी आहे. त्या ठिकाणी १७ प्रमाणे रोजंदारीवर एनएमची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अनिल लोखंडे यांच्यासह सर्व संघटना पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे.

Web Title: Increased stress on the health system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.