वीजेचा वापर वाढल्याने देयकांची रक्कम वाढली- दीपक देवहाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 06:15 PM2020-07-11T18:15:08+5:302020-07-11T18:15:15+5:30
- संदीप वानखडे लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : महावितरण कंपनीने ग्राहकांना तीन महिन्यांचे देयक एकत्र दिले आहेत. हे ...
- संदीप वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : महावितरण कंपनीने ग्राहकांना तीन महिन्यांचे देयक एकत्र दिले आहेत. हे देयक जादा आल्याची ओरड ग्राहकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणचेबुलडाणा येथील अधिक्षक अभियंता दीपक देवहाते यांच्याबरोबर लोकमतने साधलेला संवाद.
विद्युत देयक जास्त आल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत, यावर आपले मत काय?
लॉकडाऊनचा कालावधी आणि उन्हाळा एकाच वेळी होता. याच काळात लॉकडाउनमुळे प्रत्येक व्यक्ती घरी होता. त्यामुळे, वीजेवर चालणाºया कुलर, पंखा, टिव्ही यांचा वापर नागरिकांकडून जास्त झाला. शिवाय मध्यंतरी मिटरचे वाचन न करता देयक देण्यात आली होती. आता मिटरचे वाचन करून देयक देण्यात येत असल्याने पूर्वीच्या तुलनेत जास्त दिसत आहे. ग्राहकांनी त्यांच्या शंकाचे महावितरणच्या कार्यालयात येवून निरसन करावे.
सरसरी देयक कुठल्या आधारावर देण्यात आली होती?
कोरोना संकटातील लॉकडाउनमुळे महावितरणकडून मिटर रिडींग घेण्यात आले नव्हते. आॅनलाईन देयक भरण्याचे आणि मिटर रिडींग पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. काहींनी या आवाहनला प्रतिसाद देत देयक आॅनलाईन भरली.त्यांना इत्यंभूत देयक देण्यात आली. ज्यांनी मिटर रिंडीग अपलोड केले नव्हते त्यांना सरासरी देयक देण्यात आली होती.
ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करण्यात येत आहे. एकदम तीन महिन्यांचे देयक आल्याने जादा बिल आल्याचे वाटत असले तरी ग्राहकांचा वापर वाढल्याने देयक वाढले आहे. आतापर्यंत १४ हजार ६९६ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. कोणत्याच ग्राहकाला अतिरीक्त किंवा जास्तीचे देयक दिले नाही.लॉकडाउनमध्ये वीजेचा वापर वाढल्याने देयकांची रक्कम वाढली- दीपक देवहाते