तणनाशकाचा वापर वाढला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:24 AM2021-07-16T04:24:33+5:302021-07-16T04:24:33+5:30
मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ बुलडाणा : सध्या मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. काहीजणांकडून मोबाईल गहाळही होतात. याबाबत ...
मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ
बुलडाणा : सध्या मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. काहीजणांकडून मोबाईल गहाळही होतात. याबाबत संबंधित मोबाईलधारकांच्या पोलीस प्रशासन फक्त तक्रारीच घेत नाही, तर मोबाईल शोधण्यासह ते मूळ मालकास परत देण्यासदेखील तत्पर असल्याचे बुलडाणा सायबर पोलिसांनी सिद्ध केले आहे.
उद्दिष्टानुसार पीक कर्ज वाटप होईना
बुलडाणा : पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांनी हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टानुसार पीक कर्जाचे वितरण हाेत नसल्याचे चित्र आहे. सर्वात कमी पीक कर्ज बँक ऑफ बडाेदाने वितरित केले आहे.
हॉटेल तपासणीच्या आदेशाकडे दुर्लक्ष
बुलडाणा : खवा, मिठाई यामध्ये प्रामुख्याने भेसळ होत असते. त्याची तपासणी करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मागील आठवड्यात दिले होते. परंतु या आदेशाकडे दुर्लक्ष होत असून, कुठेच हॉटेलची तपासणी करण्यात आलेली नाही.
पशुचिकित्सा संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात
बुलडाणा : राज्यातील पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने आपल्या विविध मागण्यांसंदर्भाने १५ जूनपासून विविध टप्प्यांवर राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. याअंतर्गत ६ जुलैपासून चौकटीबाहेर जाऊन सेवा न देता ‘कायद्याप्रमाणेच काम’ करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
किसान सन्मान निधीची प्रतीक्षा
मोताळा : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी तीन टप्प्यात सहा हजार रुपयांचा निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु तांत्रिक कारणाने काही शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी जमा होत नाही.