शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी बेमुदत उपोषण
By अनिल गवई | Published: November 1, 2023 12:22 PM2023-11-01T12:22:55+5:302023-11-01T12:26:10+5:30
विविध रोगराई आणि पावसातील खंडामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी आणि शेतमजूरांच्या विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकर्यांच्यावतीने खामगावात बेमुदत उपोषणाला सुरूवात करण्यात आली. यावेळी शेतकर्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकार्यांना सादर करण्यात आले.
यावेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, विविध रोगराई आणि पावसातील खंडामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. नुकसानग्रस्त शेतकर्यांना एकरी १० हजारारूपयांची सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी. सोयाबीनला ९ हजार रूपये तर कापसाला साडेबारा हजार भाव देण्यात यावा. दुष्काळग्रस्त परिसि्थतीमुळे शेतकर्यांना एकरी ५० हजारांची मदत करावी, खामगाव जिल्हा आणि लाखनवाडा तालुक्यातील निमिर्ती करावी, शेतकरी जनआक्रोश यात्रेला परवानगी देण्यात आली. शेतकर्यांचा अवमान करणार्या पोलीस अधिकार्यांनी शेतकर्यांची माफी मागावी, खामगाव मतदार संघातील अवैध धंदे बंद करण्यात यावे, यासह अवैध धंद्यांना पाठीशी घालणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. या बेमुदत उपोषणात मंगेश भारसाकळे, अतुल सिरसाट, कॉ. जितेंद्र चोपडे यांचा सहभाग आहे.