आशा, स्वयंसेविका, गटप्रवर्तकांचा बेमुदत संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:46 AM2021-06-16T04:46:10+5:302021-06-16T04:46:10+5:30
ते स्थानिक पत्रकार भवन येथे १५ जून रोजी अयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. अनेक वेळा सांगूनही सरकार आशाच्या मागण्याची ...
ते स्थानिक पत्रकार भवन येथे १५ जून रोजी अयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. अनेक वेळा सांगूनही सरकार आशाच्या मागण्याची दखल घेत नाही. कोरोना काळात कामे करूनही कमी मानधन दिले जात आहे. त्यामुळे राज्यभरातील ७० हजार आशा वर्कर आणि चार हजार गट प्रवर्तकांनी संपाची हाक दिली आहे. या सर्वांनी एकत्रित येत हा संप करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली. यावेळी सीमा शेळके, सोनवणे, मीरा दांडगे, उज्ज्वला हिवाळे, आदींची उपस्थिती होती.
आशा वर्कर्सच्या मागण्या
आशा, गट प्रवर्तक महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात बेड राखीव असावेत, आशांना मास्क, पीपीई किट, ग्लोव्हज, सॅनिटायझर पुरेशा प्रमाणात मिळावे, मानधनात वाढ करण्यात यावी, अनेक आशांचे आणि कुटुंबीयांचे कोरोनात मृत्यू झाले, त्यांनाही सुविधा देण्यात आलेल्या नाहीत, असे अनेक प्रश्न आशा, स्वयंसेविका, गटप्रवर्तकांचे आहेत.