भारतीय तिरंजादी संघाला कंपाऊंड प्रकारात सुवर्ण

By निलेश जोशी | Published: October 5, 2023 04:55 PM2023-10-05T16:55:22+5:302023-10-05T16:56:41+5:30

दक्षिण कोरीयाच्या संघाचा त्यांनी एकतर्फी पराभव करत ही किमया साधली आहे.

Indian archery team wins gold in compound event | भारतीय तिरंजादी संघाला कंपाऊंड प्रकारात सुवर्ण

भारतीय तिरंजादी संघाला कंपाऊंड प्रकारात सुवर्ण

googlenewsNext

बुलढाणा: हांगझाऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी कमाल करत कंपाऊंड प्रकारात सुवर्ण पटकावले आहे. या संघामध्ये महाराष्ट्राच्या अेाजस देवतळे, प्रथमेश जावकार आणि दिल्लीच्या अभिषेक वर्माचा समावेश आहे. दक्षिण कोरीयाच्या संघाचा त्यांनी एकतर्फी पराभव करत ही किमया साधली आहे.

सेमीफायनलमध्ये त्यांनी चाईनच तैपाईला दहा गुणांच्या अर्थात एकतर्फी सामन्यात पराभतू करत अंतिम फेरीत धडक मारली होती. दरम्यान कंपाऊंड प्रकारात भारताच संघ हा जागतिक क्रमावारी पहिल्यास्थानावर असल्याने कॉलीफाईंग राऊंडपासून या स्पर्धेत भारतीय संघाने वर्चस्व राखले होते. अंतिम सामन्यातही दक्षीण कोरीयाला भारतीय संघाने पाच गुणांच्या फरकाने मात देत सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. २४० पैकी २३५ गुण भारतीय संघाने घेतले तर दक्षिण कोरिया संघाला २३० गुणापर्यंतच मजल मारता आली.

दरम्यान एक दिवसापूर्वीच अेाजस देवतळे आणि ज्योती सुरेखा वेण्णम यांनी कम्पाऊंड मिश्र  प्रकारात सुवर्ण वेध घेतला होता. त्यानंतर आशिया स्पर्धेत भारतीय संघातील महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी पुन्हा कमाल केली आहे.

तिरंदाजीत ऐतिहासिक कामगिरी

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारतीय संघाने तिरंदाजी स्पर्धेत दोन सुवर्णाची आतापर्यंत कमाई केली असून यामध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंचा मोठा हातभार लागला आहे. यात कंप्माऊंड मिश्र प्रकारात अेाजस देवतळे त्यानंतर कम्पाऊंड प्रकारात अेाजसह बुलढाण्याच्या प्रथमेश जावकारने दमदार कामगिरी करत महाराष्ट्रासह देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षारंनी आपले नाव कोरले आहे.

Web Title: Indian archery team wins gold in compound event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.