भारतीय संस्कृतीने अमेरिका समृध्द होईल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 07:59 PM2018-07-17T19:59:08+5:302018-07-17T19:59:20+5:30
भारताची परंपरा व संस्कृती अगाध असून त्याच्या आदान प्रदानाने अमेरिका नक्कीच समृध्द होईल. तसेच भारतीय शिक्षण प्रणालीतून युरोपीय देश अनेक संकल्पना आत्मसात करतात, असे प्रतिपादन टिचर्स फॉर ग्लोबल क्लासरुम प्रकल्पाअंतर्गत संस्कार
संस्कार ज्ञानपीठ प्रशालेत अमेरिकन शिक्षकांचे प्रतिपादन
खामगाव : भारताची परंपरा व संस्कृती अगाध असून त्याच्या आदान प्रदानाने अमेरिका नक्कीच समृध्द होईल. तसेच भारतीय शिक्षण प्रणालीतून युरोपीय देश अनेक संकल्पना आत्मसात करतात, असे प्रतिपादन टिचर्स फॉर ग्लोबल क्लासरुम प्रकल्पाअंतर्गत संस्कार ज्ञानपीठ येथे अभ्यास दौºयावर आलेल्या रॉबनी हॅरीसन व मेरील बेल यांनी पालकांशी संवाद साधताना केले.
मेरील बेल व रॉबनी हॅरीसन या सामाजिक शास्त्राच्या शिक्षिका अमेरिकन अभ्यासक्रमातील भारतीय इतिहास अभ्यासण्यासाठी भारत दौºयावर आलेल्या आहेत. तेथील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक अनुभव व दस्तावेज देण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील संस्कार ज्ञानपीठ या शाळेची निवड टिजीसी प्रकल्पाअंतर्गत करण्यात आली.
संस्कार ज्ञानपीठ येथील कार्यक्रमातील भारतीय परंपरा, संस्कृती व आदरतिथ्याच्या सजीव चित्रणाने अमेरिकन शिक्षिका भारावून गेल्या होत्या. सर्वप्रथम महाराष्ट्रीय फेटे बांधुन त्यांचे कुंकुम तिलकाने पारंपारीक स्वागत करण्यात आले. शाळेतील दररोजची प्रार्थना पध्दती, शिक्षण आदान प्रदान पध्दती, विविध परिक्षांचे मुल्यांकन, शाळेतील अभिनव प्रकल्प, सांस्कृतिक वारसा, बालमानसशास्त्र, अभ्यासक्रमातील सहविषय, आदिंचे विस्तृत अध्ययन त्यांच्यामार्फत करण्यात आले. भारतीय वेशभुषा, खानपान, पारंपारीक खेळ, आतिथ्य यांचा समन्वय साधणारा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्या समक्ष प्रस्तुत करण्यात आला.
अमेरिकन शिक्षकांना शाळेतर्फे खादीचा पोशाख तसेच चरखा देवून गौरविण्यात आले. शाळेचे अध्यक्ष सागर फुंडकर, उपाध्यक्ष आमदार अॅड.आकाश फुंडकर, संचालक अमित किर्तने यांनी टिजीसी प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रशांत धर्माधिकारी, प्रमुख उपस्थितीत टिजीसीचे राजेश पाटील, शेखर खोमणे, मुख्याध्यापिका भावना चितलांगे यांच्यासह पालकवर्गाचा समावेश होता. कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदिंनी समर्थपणे सांभाळली.
अमेरीकन शिक्षिकांनी धरला लावणीचा ठेका
यावेळी अमेरिकन शिक्षिकांनी यावेळी लावणी नृत्याचे प्रशिक्षण घेतले. भारतीय पारपांरिक खेळ जसे, डिग्गर, चंपोल, पेबल्स सारखे खेळ प्रत्यक्ष कृतीतून शिकल्यात. पुरणपोळी, करंज्या, बाजरी भाकरी, कढी आदी बनविण्याचे प्रशिक्षण घेतांना त्या आनंदी दिसून आल्या.