विविध मागण्यांसाठी भारतीय किसान संघाचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:42 AM2021-09-09T04:42:05+5:302021-09-09T04:42:05+5:30
केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात येत आहे. परंतु शेतकऱ्यांना सर्वच पिकांसाठी लागत खर्चाच्या आधारावर लाभकारी मूल्य ...
केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात येत आहे. परंतु शेतकऱ्यांना सर्वच पिकांसाठी लागत खर्चाच्या आधारावर लाभकारी मूल्य मिळत नाही. शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बाजारव्यवस्था विकसित करण्यात आलेली नाही. भारतीय शेतकरी हा कर्जबाजारी व दिवसेंदिवस गरीब होत चालला आहे. सरकारने घोषित केलेल्या भावानेच धान्य खरेदी करण्यात यावी, त्याच्यापेक्षा कमी भावाने खरेदी केल्यास त्याबाबत कठोर कायदा करण्यात यावा. आदी मागण्यांसाठी भारतीय किसान संघाचे देशव्यापी धरणे आंदोलन ८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले. त्याला पाठिंबा म्हणून भारतीय किसान संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले. या आंदोलनात भारतीय किसान संघाचे प्रांत उपाध्यक्ष मुकुटराव भिसे, प्रांत महामंत्री बाबुराव देशमुख, जिल्हाध्यक्ष प्रशांत गुप्ता, सुरेंद्र गावंडे, जिल्हामंत्री कैलास ढोले, राजेंद्र जाधव, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार खडके, मुकुंद वानखेडे, अर्जुनराव गारोडे, कार्यकारिणी सदस्य वसंत मिरगे, एकनाथ हेलगे, ज्ञानदेव मुकुंद, गजानन सावतकार, प्रवीण बगाडे, मधुकर भारसाकळे, विजय सावळे आदींनी सहभाग घेतला़