इंडियन पिंच्याक सिल्याटचे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी श्रीनगरमध्ये दाखल -

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:36 AM2021-03-27T04:36:09+5:302021-03-27T04:36:09+5:30

युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार भारतीय विश्वविद्यालय संघ ऑलम्पिक कौन्सिल ऑफ एशिया मान्यतेनुसार जम्मू काश्मीर (श्रीनगर) येथील स्पोर्ट स्टेडियम ...

Indian Pinnacle Sylhet players arrive in Srinagar for national tournament - | इंडियन पिंच्याक सिल्याटचे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी श्रीनगरमध्ये दाखल -

इंडियन पिंच्याक सिल्याटचे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी श्रीनगरमध्ये दाखल -

googlenewsNext

युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार भारतीय विश्वविद्यालय संघ ऑलम्पिक कौन्सिल ऑफ एशिया मान्यतेनुसार जम्मू काश्मीर (श्रीनगर) येथील स्पोर्ट स्टेडियम पोलो ग्राऊंडवर महाराष्ट्राचे १२६ खेळाडू दाखल झाले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले, परवेझ अहमद यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. पिंच्याक सिल्याट हा इंडोनेशियन मार्शल आर्ट प्रकारचा खेळ असून तो स्टॅंडिंग (फाईट) तुंगल (सिंगल कताज), रेग्यु ( ट्रिपल कताज) व गंडा (डेमो फाईट) या चार प्रकारात खेळला जातो. हा खेळ देशात युवती महिला विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी लोकप्रिय झाला आहे. ह्या खेळाचा शालेय व अखिल भारतीय पोलीस खेळ महासंघाच्या खेळात समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी देशातून २४०० खेळाडू सहभागी झालेले आहेत. यामध्ये संकेत धामंदे यांच्या नेतृत्वात बुलडाणा जिल्ह्याचे खेळाडू खेळणार आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पिंच्याक सिल्याट संघाची गेल्या दहा वर्षापासून उत्कृष्ट कामगिरी असून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदके मिळवून खेळाडूंना आपले भविष्य घडविण्याची संधी उपलब्ध झालेली असल्यामुळे खेळाडूंनी संधीचा फायदा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Indian Pinnacle Sylhet players arrive in Srinagar for national tournament -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.