उंद्री : ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:21 AM2017-10-10T00:21:27+5:302017-10-10T00:22:28+5:30
उंद्री: सत्ताधारी भाजपाला धडा देत काँग्रेसने सरपंच पदाची मुसंडी मारत पक्षीय बलाबलातही उपसरपंच पदावर दावा केला आहे. सर्व जिल्हय़ाचे लक्ष असलेल्या उंद्री ग्रा.पं.वर अखेर काँग्रेसचा झेंडा फडकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
उंद्री: सत्ताधारी भाजपाला धडा देत काँग्रेसने सरपंच पदाची मुसंडी मारत पक्षीय बलाबलातही उपसरपंच पदावर दावा केला आहे. सर्व जिल्हय़ाचे लक्ष असलेल्या उंद्री ग्रा.पं.वर अखेर काँग्रेसचा झेंडा फडकला.
अनेक दिग्गज उंद्रीच्या सरपंच पदाच्या रिंगणात होते. काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश घेतलेले प्रदीप आंभोरे यांनी जोरदार मुसंडी मारत सरपंच पदीची माळ गळय़ात घातली. उंद्री जि.प.व पं.स. गणात भाजपाला निवडून देणार्या जनतेने मात्र ग्रा.पं.ला भाजपाला धक्का देत काँग्रेसला बहुमतात निवडून दिले. सरपंचपदी प्रदीप आंभोरे तब्बल अंदाजे ४00 बहुमताने निवडून आले. या निवडणुकीत काँग्रेस प्रणित पॅनलचे एकूण ५ सदस्य निवडून आले. यामध्ये वार्ड क्र.१ मध्ये शकुंतला रामभाऊ पारखेडे काँग्रेस पॅनलच्या तर भाजपा प्रणित पॅनलचे गणेश काळे व गो पाल जगताप निवडून आले. तर वार्ड क्र.२ मध्ये काँग्रेस प्रणित पॅनलचे शकुंतला रामभाऊ पारखेडे, जितेंद्र राऊत तर भाजपा प्रणित पॅनलचे स्वाती राजू लाहुडकार विजयी झाल्या. वार्ड क्र.३ मध्ये काँग्रेस प्रणित पॅनलचे शिवा दांदडे पाटील तर भाजपा प्रणित पॅनलचे अशोक हातागळे व कळसकर हे विजयी झाले वार्ड क्र.४ मध्ये भाजपा प्रणित पॅनलच्या कमलबाई तेलरकर, काँग्रेस पॅनलचे रमेश पाटील व अविरोध म्हणून सुनीता झिने विजयी झाल्या. वार्ड क्र.५ मध्ये भाजपा प्रणित पॅनलच्या सुनीता गणेश जगताप तर अविरोध संदीप अंभोरे व अपक्ष शे. रफिक शे. बुर्हाण विजयी झाले. यामध्ये काँग्रेसच्या ५ मधून एक सदस्य दोन ठिकाणी विजयी झाले तर भाजपाचे सात अपक्ष एक व अविरोध दोन असे सदस्य निवडून आले. यानंतरची उपसरपंच पदाची निवड ही अत्यंत चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे. या निवडणूकीत आमदार राहुल बोंद्रे यांनी विशेष लक्ष देऊन व उंद्रीचे दौरे करून सरपंच पदाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली होती. यामध्ये सत्ताधार्यांना धक्का देत काँग्रेसने सरपंच पद खेचून आणण्यास यश मिळविले. आता सर्व लक्ष उपसरपंच पदाच्या निवडीवर केंद्रित आहे व ही निवड अत्यंत चुरशीची ठरेल.