बुलडाणा जिल्ह्यातील उद्योगाना घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 11:19 AM2021-08-12T11:19:31+5:302021-08-12T11:19:41+5:30

Industry in Buldana district : केवळ ४४३ उद्योग सुरू असून, उर्वरित ४२३ उद्योगांना कुलूप लागले आहे.

Industry in Buldana district collapse | बुलडाणा जिल्ह्यातील उद्योगाना घरघर

बुलडाणा जिल्ह्यातील उद्योगाना घरघर

googlenewsNext

- भगवान वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : आधीच मागासलेला असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील उद्योगाना मरगळ आलेली असतानाच त्यामध्येच कोरोनाने आगीत तेल ओतून उद्योगनगरींना होत्याचे नव्हते करून टाकले आहे. जिल्ह्यातील सात एमआयडीसीत परवानगी मिळालेल्या ८६६ उद्योगांपैकी केवळ ४४३ उद्योग सुरू असून, उर्वरित ४२३ उद्योगांना कुलूप लागले आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश रोजगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. 
बुलडाणा जिल्ह्यात एकूण सात औद्योगिक वसाहती आहेत. या सात वसाहतीमध्ये तब्बल ८६६ उद्योगाना परवानगी देण्यात आली होती. बुलडाणा जिल्ह्यात उद्योगांना लागणारे पाणी, कुशल मजूर वर्ग, सोबतच अपुरी वाहतूकीचे संसाधने यामुळे जिल्ह्यातील सात एमआयडीसीतील अनेक उद्योजकांनी आपले उद्योग बाहेर राज्यात हलविले असल्याचीही माहिती आहे. असे जरी असले तरी आहे त्या संसाधनावर उद्योग सुरू ठेवणाऱ्या  उद्योजकांना मागील काही काळापासून कोरोनाने मोठा फटका दिला आहे. यामुळेच की काय मागील दोन वर्षात बुलडाणा जिल्ह्यातील ४२३ उद्योग बंद पडले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  कोरोनामुळे उद्योग क्षेत्रातील अर्थकारणालाही मोठा फटका बसून काही उद्योग डबघाईस आलेले आहेत.


यामुळे नाही विकास 
जिल्ह्यात खामगाव वगळता दुसरी कोणतीही मोठी बाजारपेठ नाही, जिल्ह्यात केवळ कच्चा माल हा शेती उद्योगाचा असून, त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग नाही, मोठे उद्योजक येण्यास तयार नाहीत. मूलभूत सूविधा आणि आकर्षक वेतनाअभावी कुशल कामगार येण्यास धजत नाहीत. तर बाहेर राज्यातून आणावा लागणारा कच्चा माल जिल्हाभर पोहचविण्यासाठी आवश्यक ती रेल्वेलाईन नाही. या आणि अशा अनेक कारणाने जिल्ह्यातील उद्योगाना मरगळ आली आहे.


उद्योग बंद पडण्याचे प्रत्येक ठिकाणची वेगळी कारणे आहेत. मात्र यामध्ये वाहतुकीच्या अडचणी हे सगळ्यात महत्वाचे कारण आहे. विशेष म्हणजे स्थानिक मजूर वर्ग मिळत नसल्यानेही अनेकांनी आपले उद्योग बाहेर ठिकाणी हलविले आहेत.    
- ए.टी. बोबडे, उपअभियंता, औद्योगिक वसाहत,खामगाव.

Web Title: Industry in Buldana district collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.